मानलं भावा तुला! लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहत्याचा हैदराबाद ते मुंबई अनवाणी पायांनी प्रवास; सोनूनेही मानले आभार


कलाकार आणि त्यांचे चाहते, या दोघांचेही एक जुने आणि घट्ट नाते आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला भेटण्यासाठी चाहते जीवाचं रान करून कोणत्याही थराला जातात. असेच काहीसे आता पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. कोरोना काळात लोकांसाठी ‘देवदूत’ बनून त्यांची आवश्यक ती मदत करणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद होय. त्याने लॉकडाऊनदरम्यान केलेल्या कामामुळे त्याला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. अशातच आता सोनूने आपल्या चाहत्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने सांगितले आहे की, कशाप्रकारे त्याचा चाहता हैदराबाद ते मुंबई अनवाणी पायपीट करत त्याला भेटण्यासाठी पोहोचला.

सोनूने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो आपल्या चाहत्यासोबत पोझ देताना दिसत आहे. या फोटोत त्याच्या चाहत्याच्या हातात आपल्या आवडत्या अभिनेत्याचे पोस्टर असून तोंडावर स्मितहास्य दिसत आहे. या पोस्टरवर ‘हैदराबाद ते मुंबई’ असे लिहिले आहे.

आपल्या चाहत्यासोबतचा फोटो शेअर करत सोनूने लिहिले की, “वेंकटेश, मला भेटण्यासाठी हा मुलगा अनवाणी पायांनी हैदराबादवरून मुंबईला आला आहे. तरीही त्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूकीची व्यवस्था केली होती. तो खरोखर प्रेरणादायी आहे. मी त्याचा आभारी आहे.”

यासोबतच अभिनेत्याने आपल्या सर्व चाहत्यांना विनंती करत पुढे लिहिले आहे की, “कृपया! मी कोणालाही अशाप्रकारची गोष्ट करण्यासाठी उत्साहित करत नाहीये. माझं तुम्हा सर्वांवर खूप प्रेम आहे.” त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

सोनूला भेटण्यासाठी तो चाहता किती उत्सुक होता, हे फोटोतील त्याच्या स्मितहास्यावरून समजते. खरं तर सोनू चित्रपटांपेक्षाही अधिक लॉकडाऊनदरम्यान लोकांच्या मदतीमुळे चर्चेत आहे. कोरोना काळात लोकांचा जीव वाचवणे असो किंवा नोकरीची व्यवस्था करणे असो, सोनू शक्य तो प्रयत्न करून लोकांच्या मदतीचे काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादववर गुन्हा दाखल; महिलांबद्दल अश्लील गाणे बनवल्याचा आरोप

-‘ये परदा हटा दो’ गाण्यावरील मानसी नाईकच्या एक्सप्रेशन्सवर तिचा पतीही झाला फिदा; कमेंट करत म्हणतोय, ‘ये चांद…’

-उर्वशीच्या पोटात एका व्यक्तीने दणादण मारल्या बुक्क्या; त्रास होत असूनही अभिनेत्रीने गपगुमान केले सहन


Leave A Reply

Your email address will not be published.