बॉलिवूड अभिनेता सोनू सूद या दिवसात खूपच चर्चेत आहे. तो नेहमीच अनेकांना मदत करताना दिसला आहे. एक अभिनेता म्हणून तर तो सर्वांना आवडतच होता, पण आता त्याच्या या कामगिरीनंतर आता तो प्रेक्षकांना जास्त आवड लागला आहे. मागील एका वर्षापासून तो गरजूंना मदत करत आहे. अनेकजण आता त्याच्या घरी जाऊन त्याची मदत मागत आहेत. इथेही तो आपल्या घराबाहेर येऊन लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो.
नुकतेच काही दिवसांपूर्वी एक कॅन्सर पिडीत व्यक्ती त्याच्या घरी आला होता. जो सोनू सूदला बघून त्याच्या पाया पडतो आणि त्याला बघून रडायला लागतो. त्याला पाहून सोनू देखील भावुक होतो. त्याने त्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्याच्याविषयी एक भावुक पोस्ट देखील लिहिली आहे. सोनू सूद हा सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्या पीडित व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक नावाचा एक व्यक्ती त्याला भेटायला येतो आणि त्याला पाहून भावुक होतो. तो रडू लागतो आणि त्याच्या पाया पडतो. सोनू सूद हे सगळं करण्यापासून नकार देतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो त्या व्यक्तीला शांत करतो आणि त्याला फोनही गिफ्ट करतो.
हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले की, “संपूर्ण देशात आज सगळेजण समस्येत आहेत. कोरोना रुग्ण आता कमी होत आहेत. पण परिवाराची आर्थिक परिस्थिती अजूनही तशीच आहे. अभिषेकला भेटलो, ज्याने ऐकण्याची क्षमता गमावली आहे. त्याच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.” त्याने पुढे लिहिले की, “मी तो लवकरच ठीक होईल अशी आशा करतो. मी लोकांना अशी विनंती करतो की, त्यांनी पुढे यावे आणि त्याला मदत करावी.”
सोनू सूदची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याचे चाहते आणि अनेक कलाकार त्याच्या या पोस्टचे कौतुक करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी अभिनेत्रीची कोर्टात धाव