Tuesday, June 25, 2024

देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी अभिनेत्रीची कोर्टात धाव

बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्री म्हणून कंगना रणौत ओळखली जाते. कंगना नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे वादात अडकत असते. राजकारण, चित्रपट, सामाजिक अशा अनेक मुद्द्यांवर कंगना तिचे मतं मांडत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी विवादित ट्वीट करणाऱ्या कंगनाला अनेकदा तिच्या भडकाऊ ट्विटसाठी ताकीद देण्यात आली होती. मात्र, तरीही कंगनाने तिचे ट्वीट करणे काही सोडले नाही. याचमुळे अखेर कंगनाचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्यात आले.

ऑक्टोबर २०२० मध्ये कंगनावर दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे आता तिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये कंगनाचे पासपोर्टचा कालावधी संपत असल्याने तिला तिचा पासपोर्ट रिन्यू (नूतनीकरण) करायचा आहे. पण तिच्यावर दाखल असलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे पासपोर्ट रिन्यू करताना अडचणी येत आहेत. कंगनाला लवकरच तिच्या आगामी ‘धाकड’ सिनेमाच्या शूटिंगसाठी बुडापेस्टला जायचे आहे. तिथे ती ऑगस्ट २०२१ पर्यंत राहणार असून, सप्टेंबरमध्ये तिचा पासपोर्ट संपत आहे. मात्र, तिच्यावरील देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे पासपोर्ट विभागाने तिचा पासपोर्ट रिन्यू करण्यामध्ये असमर्थता दाखवली आहे. कंगनाने यासंदर्भात कोर्टात एक याचिका दाखल केली आहे.

कंगनाने तिच्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, “मी एक अभिनेत्री असून, माझ्या कामामुळे मला शूटिंगसाठी सतत परदेशात प्रवास करावा लागतो. मी एका चित्रपटाची मुख्य अभिनेत्री असून, मला १५ जून ते ऑगस्ट २०२१ पर्यंत बुडापेस्टमध्ये राहायचे असून, माझ्या पासपोर्टची अंतिम तारीख सप्टेंबर २०२१ आहे. प्रॉडक्शन हाऊसने शूटिंगचे लोकेशन बुक करण्यासाठी खूप पैसा लावला आहे. एक अभिनेत्री म्हणून मला या शूटिंगमध्ये सामील व्हायचे आहे. म्हणूनच माझा पासपोर्ट रिन्यू होणे खूप आवश्यक आहे.” कंगनाच्या या याचिकेवर १५ जून, २०२१ ला जस्टिस पीबी वराले आणि एसपी तावडे सुनावणी करणार आहेत.

ऑक्टोबर २०२० मध्ये कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात मुन्नावराली सैय्यद यांच्या तक्रारीवरून कलम १५३ अ (विविध धार्मिक समूहांमध्ये वादाला बढावा देणे), २९५ अ (धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणे), १२४ अ (देशद्रोह), ३४ (षड्यंत्र) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘थलायवी’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सध्या याचे प्रदर्शन लांबणीवर टाकले आहे. थलायवीव्यतिरिक्त कंगना ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारने चित्रपटाची फी कमी केली?? पसरलेल्या या बातम्यांना अभिनेत्याने ‘अशाप्रकारे’ दिले सडेतोड उत्तर

-सुशांतच्या आठवणीत रिया चक्रवर्ती झाली भावुक; म्हणाली, ‘तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही…’

-‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स

हे देखील वाचा