Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘अभिनेत्याला जामीन अन् संताला जेल’, म्हणत पर्ल पुरीवर भडकले आसारामचे भक्त, सोशलवर मीडियाद्वारे राग व्यक्त

सध्या टेलिव्हिजन क्षेत्रात अभिनेता पर्ल वी पुरीचे प्रकरण खूपच गाजत आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टीव्ही अभिनेता पर्ल वी पुरीला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. पॉक्सो कायद्याअंतर्गत पर्ल वी पुरीला पोलिसांनी ४ जूनला अटक केली होती. जवळपास ११ दिवसांनी पर्ल वी पुरीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्याला जामीन मिळाला म्हणून पर्लच्या फॅन्समध्ये आणि मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पर्लला अटक झाल्यानंतर पोलिसांनी पर्लविरोधात पक्के पुरावे असल्याचे सांगितले होते. मात्र, आता त्याला मिळालेला जामीन पाहून अनेकांनी या जामिनावर प्रश्न उपस्थित केले आहे. यातच आसाराम बापूच्या भक्तांनी सोशल मीडियावर याविरोधात अनेक ट्विट्स करत पर्लला जामीन मिळाल्यामुळे राग व्यक्त केला आहे.

मागील अनेक वर्षांपासून बलात्काराच्या आरोपांमुळे आसाराम बापू जेलमध्ये आहे. त्यांच्यावर देखील पॉक्सो एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मात्र, आसाराम बापूच्या या वयातही त्यांना जामीन मिळण्यामध्ये अनेक अडचणी येत आहे. मात्र, पर्लला ११ दिवसांमध्येच जामीन मंजूर झाल्याने आसाराम बापूच्या भक्तांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.

सोशल मीडियावर एका युजरने लिहिले, “वा..हा एक अभिनेता आहे ज्याला जामीन मिळाला आहे. ज्या भरात देशाला संतांची भूमी म्हटले जाते, जिथे निर्दोष आसाराम बापुना त्याच पॉक्सो कायद्याअंतर्गतच जामीन मिळत नाहीये. भारताची न्यायव्यवस्था फक्त पैशाने खरेदी केली जाते. हा अतिशय लज्जास्पद प्रकार आहे.”

दुसऱ्या एकाने लिहिले, “हिंदू संत श्री आसारामजी बापूवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. ते निर्दोष असण्याचे अनेक पुरावे असूनही ८ वर्षात एका दिवसाचा देखील जामीन त्यांना देण्यात आला नाही, आणि अभिनेता पर्ल वी पुरीला या कलमांतर्गतच गुन्हा असूनही ११ दिवसात जामीन मिळाला. हा असा दुहेरी न्याय का?”

तत्पूर्वी, आसाराम बापूला २ सप्टेंबर २०१३ साली अटक करण्यात आले आहे. आसारामवर सुरतच्या दोन बहिणींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सोबतच SC/ST कलम आणि POCSO कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन; रामायणात साकारली होती ‘आर्य सुमंत’ची भुमिका

-‘लगान’ला २० वर्ष पूर्ण; ‘लाल सिंह चड्ढा’च्या या हटके लुकमध्ये आमिर खानने मानले चाहत्यांचे आभार

-जेव्हा गर्भवती नीना गुप्ता यांना साथ द्यायला पुढे आले होते सतीश कौशिक; मुलीला त्यांचे नाव द्यायलाही झाले होते तयार

हे देखील वाचा