मराठी सिनेसृष्टीतली प्रतिभावान अभिनेत्री तेजश्री प्रधान व्यावसायिक सोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील बरीच चर्चेत राहिली आहे. आपला भूतकाळ विसरून पुढे कसे जायला हवे आणि आयुष्य आनंदाने कसे जगावे, हे तेजश्रीकडून शिकण्यासारखे आहे. तिने तिच्या आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत. मात्र तरीही ती स्वतःला व्यस्त ठेवण्याचा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही आपल्याला बऱ्याच सकारात्मक आणि प्रेरणादायी पोस्ट्स पाहायला मिळतील.
तेजश्रीने सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टद्वारे तिच्या एका छंदाची झलक चाहत्यांना दिली आहे. वास्तविक अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती चित्र रंगवताना दिसत आहे. तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता की, तेजश्री चित्र रंगवत आहे आणि तिच्या आजूबाजूला वह्या व वेगवेगळ्या रंगाच्या पेन्सिल पडलेल्या आहेत. विशेष म्हणजे चित्रकला हा तिचा लहानपणापासूनचा छंद आहे, हेही तिने या पोस्टद्वारे सांगितले आहे.
हा फोटो शेअर करत तेजश्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “या आजच्या टेक्नो सेव्ही जगात, जिथे गोष्टी फक्त एक क्लिक दूर आहेत, तिथे मला स्वतः च त्या गोष्टी रंगविण्याची आवड आहे. मला कलर थेरपी सुचविल्याबद्दल धन्यवाद रुतू आणि ओमी. हे माझी मूड रंगीबेरंगी आणि प्रकाशमय ठेवण्यास मदत करत आहे. मित्रांनो तुम्ही सर्वांनी देखील हे करून पाहिलेच पाहिजे!! चला परत जाऊया आपल्या बालपणात.” तिच्या चाहत्यांना तिचा हा फोटो खूप आवडल्याचे दिसून येत आहे. या फोटोवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहे.
तेजश्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘झेंडा’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर बऱ्याच चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले. तिला खरी ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून मिळाली. याशिवाय ती ‘बबलू बॅचलर’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाची ऑनस्क्रीन सासूसोबत आहे खास मैत्री; भावना व्यक्त करत म्हणाली…