कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार


हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही कलाकार कुटुंब आहेत, ज्यातील मुलींना चित्रपटांत काम करण्याची परवानगी नव्हती. यामध्ये कपूर खानदानाचे नाव घेतल जाते. कपूर खानदानाने चित्रपटसृष्टीवर अक्षरश: राज्य केले आहे. मात्र, त्यांच्या घरातील मुलींना चित्रपटसृष्टीत काम करू देत नव्हते. असेच काहीसे बॉलिवूडचे एव्हरग्रीन सुपरस्टार धर्मेंद्र यांच्याबाबतही होते. धर्मेंद्र यांनी स्वत: तब्बल ६० ते ९० असे चार दशक चित्रपटसृष्टी गाजवली होती. त्यांची पत्नी आणि ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यादेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. हेमा आपल्या डान्ससाठी आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त धर्मेंद्र यांचे सुपूत्र सनी देओल आणि बॉबी देओलही चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. मात्र, मुलगी ईशा देओलबाबत त्यांचे विचार थोडे वेगळेच होते. त्यांना ईशाचा डान्स आणि चित्रपटात काम करणे आवडत नव्हते. याचा खुलासा हेमा मालिनी यांनी केला होता. (Legendary Actor Dharmendra Did Not Want Daughter Esha Deol Become Dance And Actress)

‘द कपिल शर्मा शो’दरम्यान हेमा मालिनी यांनी कपिल शर्मासोबत बोलताना सांगितले होते की, त्या स्वत: एक डान्सर आहेत. त्यामुळे घरीच सराव करायच्या. त्यांची मुलगी ईशानेही आपल्या आईचा डान्स पाहून प्रेरित होऊन डान्सर बनायचे ठरवले होते. ईशालाही व्यावसायिक डान्सरसोबत आपल्या आई- वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये कारकीर्द घडवायची होती.

पुढे बोलताना हेमा यांनी सांगितले की, “धरम जी यांना मुलीने डान्स आणि चित्रपटात काम करावे असे वाटत नव्हते. मात्र, त्यांना माझ्या डान्स परफॉर्मन्सबद्दल समजले, तेव्हा त्यांनी आपले मन बदलले आणि ईशाच्या डान्स करण्यावर बंदी घातली नाही. त्यानंतर स्वत: मुलीलाला बॉलिवूडमध्ये काम करण्याची परवानगी दिली.”

ईशाने ‘कोई मेरे दिल से पूछे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ईशाला या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यानंतर तिने ‘ना तुम जानो ना हम’, ‘धूम’ आणि ‘काल’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले. ईशाने काही तासांपूर्वीच आपल्या इंस्टाग्रामवर आयुष्यातील गोष्टींबद्दल आपला एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिने हॅट घातलेली दिसत आहे.

ईशाची चित्रपट कारकीर्द काही चांगली चालत नव्हती, त्यामुळे तिने व्यावसायिक भरत तख्तानीसोबत आपला संसार थाटला. ईशा आणि भरतला दोन मुली आहेत. सध्या ती आपले कौटुंबिक आयुष्याचा आनंद घेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लोकांची मदत करता- करता सोनूने सुरू केले आपले सुपरमार्केट; १० अंड्यांवर मिळतेय ‘ही’ जबरदस्त ऑफर

-बापरे! एका वर्षात प्रभासने नाकारल्या होत्या, एक- दोन नाही, तर तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांच्या जाहिराती

-‘…नैणा ठग लेंगे’, म्हणत प्रार्थना बेहेरेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.