Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने दिली पती निक जोनाससोबत ‘अशी’ पोझ; फोटो होतोय भलताच व्हायरल

बॉलिवूड ते हॉलिवूड अशा यशस्वी प्रवास करणाऱ्या अभिनेत्रीचे नाव सांगा, असं म्हटल्यावर सर्वांच्या तोंडात ज्या अभिनेत्रीचे नाव येते ती म्हणजे प्रियांका चोप्रा होय. प्रियांका आपल्या अभिनयाने बॉलिवूड गाजवल्यानंतर आता हॉलिवूडमध्येही डंका गाजवत आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या बाबतीत ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा चाहतावर्ग लाखोंमध्ये नाही, तर चक्क कोटींमध्ये आहे. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिने नुकताच पती निक जोनाससोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

भारतीय वेळेनुसार, सोमवारी (५ जुलै) ‘देसी गर्ल’ प्रियांकाने अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती राखाडी आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. सोबतच तिने गॉगलही घातला आहे. दुसरीकडे निकने लाल, निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे, जे काही प्रमाणात अमेरिकेच्या झेंड्याप्रमाणे दिसत आहे. प्रियांकाची पोझ अगदी पाहण्यासारखी आहे. ती निकच्या खांद्यावर आपले डोके ठेवून बसली आहे. या फोटोत ते खूपच रोमँटिक दिसत आहेत. (Actress Priyanka Chopra Poses With Her Firework Nick Jonas)

प्रियांकाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझा फायरवर्क निक. ४ जुलैच्या हार्दिक शुभेच्छा!” यासोबतच तिने यामध्ये हॅशटॅग थ्रोबॅकचाही समावेश केला आहे.

खरं तर, नुकतीच इंस्टाग्रामची २०२१मधील श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली आहे. यामध्ये केवळ दोन भारतीय व्यक्तींना स्थान मिळवता आले आहे. ते दोन भारतीय व्यक्ती इतर कोणी नसून प्रियांका चोप्रा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहेत.

प्रियांका इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते. ती मोठमोठ्या ब्रँड्सला प्रोमोटही करते. इंस्टाग्रामच्या २०२१मधील रिचलिस्टनुसार, प्रियांका आपल्या एका पोस्टसाठी कोट्यवधी रुपये घेते. माध्यमांतील वृत्तानुसार, प्रियांका एका पोस्टसाठी जवळपास ३ कोटी रुपये घेते. मागील वर्षी तिने तब्बल २, ७१, ००० डॉलर्सची कमाई केली होती.

प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘द व्हाईट टायगर’ चित्रपटात दिसली होती. रमिन बहरानी दिग्दर्शित या चित्रपटात आदर्श गौरव आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका होत्या.

दुसरीकडे सध्या प्रियांका ‘सिटॅडल’मध्ये व्यस्त आहे. यामध्ये रिचर्ड मॅडन या अभिनेत्याचा समावेश आहे. ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ होणार आहे.

हे देखील वाचा