Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

सध्याच्या नवीन पिढीतील आघाडीची अभिनेत्री असलेली कियारा आडवाणी नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे फॅन्समध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. बऱ्याच आधीपासून इंडस्ट्रीमध्ये असलेली कियारा ‘कबीर सिंग’ आला आणि रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. सौंदर्य, अभिनयाच्या जोरावर तिने देशासोबतच संपूर्ण जगात स्वतःची ओळख निर्माण केली. आज कियाराला कोट्यवधी फॅन्स आहेत. खूप कमी काळात तिने स्वतःला या क्षेत्रात सिद्ध केले आहे. असे असूनही कियाराला अनेकदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे दोघं रिलेशनशिपमध्ये असण्याच्या मागील अनेक दिवसांपासून बातम्या येत आहेत. या दोघेही अनेकदा सोबत फिरताना आणि पार्ट्यांमध्ये दिसतात. कियाराला नुकतेच सिद्धार्थच्या घराबाहेर स्पॉट केले गेले. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कियाराने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि प्रिंटेड ट्राऊझर घातली आहे. मात्र, यात तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये.

सिद्धार्थच्या घराबाहेर गाडीतून बाहेर पडत असतानाच्या या व्हिडिओवरून कियाराला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. याचे कारण म्हणजे ती गाडीतून बाहेर येण्यासाठी एका वयस्कर व्यक्तीने तिच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि तिला सलाम देखील केला. हे पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या रोषाला तिला सामोरे जावे लागत आहे. तिच्या या व्हिडिओवर यूजर्सने कमेंट करताना लिहिले की, “तू तुझ्या गाडीचा दरवाजा स्वतः उघडू शकत नाही का? त्यांचे वय बघ.” एकाने लिहिले, “तुम्ही लोकं नक्की येतात कुठून, तुझ्या वडिलांपेक्षाही जास्त वयाच्या व्यक्तींकडून सलाम करून घेते.”

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती लवकरच ‘शेरशाह’ सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार आहे. यात सिद्धार्थ परमवीरचक्र विक्रम बत्राच्या आणि कियारा त्यांच्या होणाऱ्या पत्नीच्या डिंपल चीमाची भूमिका साकारत आहे. यासोबतच ती ‘जुग जुग जियो’, ‘भूल भुलैया २’ या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे. २०१४ साली ‘फगली’पासून कियाराने तिच्या करिअरला सुरुवात केली. मात्र, तिला ‘एमएस धोनी: द अनटॉल्ड स्टोरी’ सिनेमाने प्रसिद्धी मिळवून दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर

-वाढदिवशी धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडने शेअर केले बिकिनीमधील फोटो; म्हणाली, ‘तू आणि मी…’

-५ जी प्रकरणात जुही चावलाच्या अडचणीत वाढ; दंड म्हणून २० लाख रुपये भरण्याचे कोर्टाने दिले आदेश

हे देखील वाचा