Monday, January 6, 2025
Home कॅलेंडर ‘…तू तिथे मी’, म्हणत मराठमोळ्या सुबोध भावेने खास अंदाजात पत्नी मंजिरीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘…तू तिथे मी’, म्हणत मराठमोळ्या सुबोध भावेने खास अंदाजात पत्नी मंजिरीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘कट्यार काळजात घुसली’, ‘..आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’, ‘बालगंधर्व’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम करून नावारूपाला आलेला आघाडीचा आणि धडाडीचा अभिनेता, निर्माता आणि लेखक म्हणजे सुबोध भावे होय. सुबोध भावे हा आज त्याच्या लग्नाचा विसावा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने त्याची पत्नी मंजिरी भावेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. (Actor subodh bhave give best wishes on wedding anniversary to his wife manjiri bhave)

सुबोध भावेने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “लग्नाच्या २०व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप काही न लिहिता तू तिथे मी, इतकंच.”

सुबोध आणि मंजिरी हे बालमित्र आहेत. ते लहान असल्यापासूनच एकमेकांना ओळखतात. शाळेत असल्यापासूनच सुबोधला मंजिरी आवडायची. त्याने जेव्हा तिला प्रपोज केले, तेव्हा तिने देखील होकार दिला. त्यांनी १२ जुलै २००१ मध्ये लग्न केले. त्यांना मल्हार आणि कान्हा ही दोन मुलं आहेत. ते त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप खुश आहेत.

सुबोध भावेच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, त्याने अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘फुगे’, ‘पुष्पक विमान’, ‘विजेता’, ‘भयभीत’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘तुला पाहते रे’, ‘का रे दुरावा’ आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हनुमाना’च्या भूमिकेने मिळवली होती तुफान लोकप्रियता; तर दारा सिंग यांच्यासोबत काम करताना घाबरायच्या अभिनेत्री

-सारा अली खानने दिली कामाख्या देवीच्या मंदिराला भेट; फोटो पाहून युजर्सने पाडला धर्मावरून प्रश्नांचा पाऊस

-वाचा हिंदी चित्रपटांमध्ये ‘प्राण’ टाकणाऱ्या अभिनेत्याची कहाणी; खलनायकी साकारून नायकालाही दिलीय त्यांनी टक्कर

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा