Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

इतिहासातील सोनेरी पान : बाजीप्रभूंच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीझ

आजकाल मराठी तसेच हिंदी चित्रपटाचा ट्रेंड बदलताना दिसत आहे. मारणारी, प्रेम, विवाह या पलीकडे जाऊन आता भूतकाळातील कहाणी दाखवली जाते. अनेक थोर लोकांच्या जीवन कथा पडद्यावर दाखवून त्यांचे जीवन चरित्र प्रेक्षकांसमोर मांडले जाते. मराठीमध्ये अनेक असे चित्रपट आणि मालिका बनल्या आहेत. यातच मागील अनेक दिवसांपासून एक नाव सातत्याने कानावर पडत आहे, ते ‘पावनखिंड’ या चित्रपटाचे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Actor Chinmay mandalekar share Pavankhind movie’s poster on social media)

‘पावनखिंड’ या चित्रपटाचं पोस्टर अभिनेता चिन्मय मांडलेकर याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. तसेच त्याने कॅप्शन दिले आहे की, “१३ जुलै १६६० स्वराज्याच्या इतिहासातील एक अद्भुतपूर्व लढतीचा दिवस. ‘लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे’. ही जाणीव असणाऱ्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंड लढतीला आज ३६१ वर्ष पूर्ण होत आहे. या दिवसाचे औचित्य साधत माय-बाप रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलोय ‘पावनखिंड’ चित्रपटाचे पोस्टर. स्वराज्याच्या स्वप्नासाठी उभा जन्म आणि छ्त्रपती शिवरायांसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या बलिदानाची गाथा ‘पावनखिंड’ लवकरच चित्रपटगृहात.”

त्याने शेअर केलेले हे पोस्टर जोरदार व्हायरल होत आहे. त्याचे अनेक चाहते, कलाकार या पोस्टरवर कमेंट करत आहेत. सगळेजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची कहाणी लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटात मांडली आहे. पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत, शत्रूची वाट रोखून ठेवून पराक्रम केला होता. त्यातच ते धारातीर्थी पडले होते. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्ताने पावन झालेल्या या खिंडीला पुढे ‘पावनखिंड’ हे नाव पडले. ही संपूर्ण विस्तृत कहाणी या चित्रपटातून आपल्याला पाहण्यास मिळणार आहे.

ए.ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते अजय-अनिरुद्ध आरेकर यांनी केली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-क्रिती सेननच्या ‘मिमी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ; प्रेक्षकांकडून मिळतोय तूफान प्रतिसाद

-महाराष्ट्रातल्या मातीतला एक खलनायकी अन् रांगडा चेहरा ‘निळू फुले’; उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर गाजवलीत त्यांनी चार दशकं

-‘जाने क्या बात है!’ अन्विताने शेअर केला ‘ओम-स्वीटू’चा रोमँटिक फोटो; चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

हे देखील वाचा