क्रिती सेननच्या ‘मिमी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ; प्रेक्षकांकडून मिळतोय तूफान प्रतिसाद


बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन ही तिच्या नवनवीन प्रोजेक्टमुळे खूप चर्चेत आहे. सध्या ती तिच्या आगामी चित्रपट ‘मिमी’ मुळे प्रकाशझोतात आली आहे. या चित्रपटाचा पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्यात क्रिती प्रेग्नेंट दिसत होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे.

या ट्रेलरमध्ये एका सरोगसी आईची कहाणी दाखवली आहे. जी भूमिका क्रिती सेनन निभावत आहे. एका अमेरिकन जोडप्याला बाळ पाहिजे असल्याने, ते बाळ क्रितीच्या गर्भात वाढवण्यासाठी ते तिला विनंती करतात. तसेच त्यासाठी ते तिला २० लाख रुपये देणार आहेत असे सांगतात. यावर ती तयार होते. पण नंतर त्यांना हे बाळ नको असतं. त्यामुळे ते जोडपं तिला गर्भपात करण्यास सांगतात. या दरम्यान तिची होणारी मानसिक आणि शारीरिक अवहेलना या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होऊन केवळ एकच तास झाला आहे. परंतु प्रेक्षकांनी या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला आहे. हा संपूर्ण चित्रपट पाहण्यास प्रेक्षक खूप उत्सुक आहेत

या चित्रपटात क्रितीसोबत सुप्रिया पाठक, पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पाहवा हे देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाची शूटिंग मागच्या वर्षी पूर्ण झाली आहे. हा चित्रपट महिला केंद्रित असणार आहे. यामध्ये सरोगेट आईची कहाणी दाखवली जाणार आहे. दिनेश विजान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर हा चित्रपट ३० जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयाच्या २३व्या वर्षी तुटलं होतं कृष्णा श्रॉफचं हृदय; टायगर श्रॉफच्या बहिणीला आली पहिल्या प्रेमाची आठवण

-भारती झालीय म्हातारी! तरीही हर्ष म्हणतोय, ‘प्रेम तर नेहमी तरुणच असते…’; व्हिडिओवर उमटतायेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

-‘…माझ्या काही अत्यंत आवडीच्या गोष्टी’, म्हणत पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली सोनाली कुलकर्णी; एक नजर टाकाच


Leave A Reply

Your email address will not be published.