Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड आदिल खानसोबत जोरदार ठुमके लावताना दिसली शिल्पा शेट्टी; ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरचा धमाल परफोर्मेंस होतोय व्हायरल

आदिल खानसोबत जोरदार ठुमके लावताना दिसली शिल्पा शेट्टी; ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरचा धमाल परफोर्मेंस होतोय व्हायरल

‘फिटनेस’ हा शब्द ऐकला तरी सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते ते एकच नाव. ते म्हणजे बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री शिल्पा शेट्टी. वयाच्या ४५ व्या वर्षी देखील एवढा फिटनेस बघून भल्या भल्या अभिनेत्री तिच्यासमोर गार होतात. तिने अभिनयासोबतच डान्सने देखील चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. शिल्पा शेट्टी ही लवकरच तिचा विनोदी चित्रपट ‘हंगामा २’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीचे जुने ‘गाणे चुरा के दिल मेरा’ याचे रिमेक वर्जन केले आहे. अशातच शिल्पा शेट्टीच्या या गाण्यावरील एका डान्स व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. (Shilpa Shetty dance with Aadil khann on chura ke dil mera song)

https://www.instagram.com/p/CRUGlj9Ldhl/?utm_source=ig_web_copy_link

शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा हा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती कोरीओग्राफर आदिल खानसोबत ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “नवीन गाणे आणि जुना स्वॅग, हे खूप धमाकेदार कॉम्बिनेशन आहे.” या व्हिडिओला प्रेक्षक जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज खूपच आवडला आहे.

हा व्हिडिओ तेव्हाचा आहे, जेव्हा ती ‘हंगामा २’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. त्यावेळी तिने क्रॉप टॉप आणि ब्राऊन कलरचा लेदरचा स्कर्ट घातला होता. या ड्रेसमुळे शिल्पा शेट्टी खूप ट्रोल देखील झाली होती.

शिल्पा शेट्टी ही ‘हंगामा २’ या चित्रपटात‌ दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. यात शिल्पा, परेश रावल, राजपाल यादव आणि अन्य कलाकार दिसणार आहेत. प्रियदर्शन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट २४ जुलैला डिज्नी प्लस हॉट स्टारवर प्रदर्शित होणार आहे. २००३ मध्ये त्यांचा ‘हंगामा’ हा चित्रपट आला होता. त्याच चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘डिज्नी प्रिंसेस’ दिसतेय रुबीना दिलैक; पाहा अभिनेत्रीच्या मनमोहक अदा

-‘सच कहूं तो’मध्ये नीना गुप्ता यांनी केला त्यांच्या पहिल्या लग्नाबाबत खुलासा; म्हणाल्या, ‘तो अनुभव खूपच…’

-खरी-खुऱ्या आयुष्यातली ‘बार्बीडॉल’ आहे कॅटरिना कैफ; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

हे देखील वाचा