हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींमध्ये ज्यांचा समावेश होतो, त्या म्हणजेच दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त होय. आज भलेही त्या आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या कामाच्या रूपाने त्या आजही आपल्यात जिवंत आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्या केवळ त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळे नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील त्या चर्चेत होत्या. संजय दत्त त्याची आई नर्गिस दत्त यांच्या खूप जवळ होता. त्यांनी त्यांच्या मुलांच्या पालनपोषणासाठी चित्रपटसृष्टी सोडून दिली होती. परंतु संजय दत्तने त्यांच्या 22 व्या वर्षी रॉकी या पहिल्या चित्रपटाच्या तीन दिवस आधीच त्याच्या आईला गमावले होते.
संजय दत्तची (sanjay dutt) बहीण नम्रता दत्त हिने तिच्या बायोग्राफीमध्ये सांगितले होते की, कधी कधी संजय दत्तच्या वागण्याने आई चिंतेत होती. कधी कधी वैतागून ती त्याला ‘गाढव’ पण म्हणत असत.
या पुस्तकानुसार एकदा नर्गिस दत्त (nurgis dutt) यांनी म्हटले होते की, “संजय दत्त त्याच्या मित्रासोबत दार बंद करून काय करत असतो. काही गडबड आहे का? तो गे तर नसेल ना?” या पुस्तकात प्रिया दत्तने सांगितले की, नर्गिस दत्त त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवत होती. ती या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हती की, तो ड्रग्ज घेतो. जेव्हा लोकांनी तिला संजयबाबत सांगितले, तेव्हा ती म्हणाली की, माझा मुलगा ड्रिंक करत नाही आणि ड्रग्ज पण घेत नाही.”
संजय दत्तला आईची शेवटची इच्छा ही त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी समजली होती. जी ऐकल्यानंतर संजय दत्त खूप रडला होता. त्यांनी लिहिले होते की, “संजू नेहमी प्रामाणिक राहा, कधीच वाईट काम करू नकोस. नेहमी मोठ्यांचा आदर कर. या गोष्टी तुला खूप पुढे घेऊन जातील आणि यातून तुला खूप ताकद मिळेल.”
नर्गिस दत्त यांचे निधन 3 मे, 1981 मध्ये झाले होते. बॉलिवूडमधील त्या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी 1935 मध्ये बालकलाकार म्हणून ‘तलाश-ए-हक’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्यांनी ‘मदर इंडिया’ या चित्रपटात काम केले होते. केवळ 28 व्या वर्षी एका वृद्ध स्त्रीचे पात्र निभवल्याने त्यांना खूप शाबासकी मिळाली होती.
नर्गिस यांच्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटाला 1958 मध्ये ऑस्कर या पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. त्यांनी त्याच्या करिअरमध्ये प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळवले आहे. त्यांची डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्यांनी राज कपूर यांच्यासोबत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्यांनी 1958 मध्ये सुनील दत्त यांच्याशी लग्न केले होते. सुनील दत्त हे देखील एक लोकप्रिय अभिनेते होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही नक्की वाचा-