बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल हा त्याच्या लूकमुळे नेहमीच इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असतो. सोशल मीडियावर तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ तो सातत्याने शेअर करत असतो. मागील काही दिवसात त्याने काढलेली गणपतीची एक पेंटिंग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होती. प्रेक्षकांना त्याची ही पेंटिंग खूप आवडली होती. आता देखील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो व्हिडिओ पाहून त्याचे चाहतेच काय, तर अनेक बॉलिवूड कलाकारदेखील त्याला प्रतिक्रिया देत आहेत.
विक्की कौशलने रविवारी (१८जुलै) एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याचा कूल लूक दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो सोफी टकर याचे रॅप साँग पर्पल हॅटवर लिपसिंक करताना दिसत आहे. त्याने हा व्हिडिओ त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बनवला आहे. (Vicky kaushal share his rap video, Hrithik Roshan and deepika padukone get impress on him)
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने पीच कलरची हुडी घातली आहे. तसेच पांढरे जॅकेट घातले आहे. तो केसांमध्ये हात फिरवताना दिसत आहे. तसेच तो हुडी कॅप डोक्यावर घालून लिपसिंक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने एक मजेशीर कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले आहे की, “खूप क्यूट वाटले पण १००% नंतर डिलीट करेल. खूप जोरात ऍक्टिंग येत होती. व्हॅनिटी जॅम पर्पल हॅट.”
त्याचा हा व्हिडिओ आणि सोबतच हे मजेशीर कॅप्शन सर्वांनाच खूप आवडले आहे. त्याचे अनेक चाहते तसेच बॉलिवूडमधील कलाकार या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. दीपिका पदुकोणने या व्हिडिओवर हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे.
सुपरस्टार ऋतिक रोशनने या व्हिडिओवर कमेंट करून लिहिले आहे की, “मला खूप आवडले.” यावर विक्कीने उत्तर दिले आहे की, “ओह तुम्हाला आवडले मी तर मेलो.” दुसरीकडे शिरीन मिर्झाने लिहिले आहे, “नको करुस.” तसेच क्रिती सेनन आणि आयुष्मान खुराना यांनी फायर इमोजी पोस्ट करून त्याचे कौतुक केले आहे.
नुकतेच विक्की कौशलने बॉलिवूडमध्ये ९ वर्ष पूर्ण केले आहेत. विक्कीने सोशल मीडियावर २०१२ साली दिलेल्या ऑडिशनचा एक फोटो शेअर केला होता. विक्की या दिवसात आदित्य धर यांच्या ‘द: इम्मोर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया










