अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया


टीव्हीवर असे अनेक शो आहेत, जे आपल्या अविस्मरणीय एपिसोड्स, स्पर्धकांचे परफॉर्मन्स आणि इतर बऱ्याच गोष्टींमुळे प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. त्यातीलच एक म्हणजे ‘इंडियन आयडल’ होय. या शोचं हे बारावं पर्व आहे. हा शो आता आपल्या शेवटच्या भागाकडे जात आहे. म्हणजेच प्रेक्षकांना याच्या ग्रँड फिनालेची चांगलीच उत्सुकता लागली आहे. याच्या ग्रँड फिनालेची तारीखही जाहीर झाली आहे. यावेळी शोचा ग्रँड फिनाले खूपच रंजक होणार आहे. शोमधून आशिष कुलकर्णी बाहेर पडल्यानंतर शोला आपले टॉप ६ स्पर्धक मिळाले होते. त्यात पवनदीप राजन, सायली कांबळे, निहाल, शनमुखप्रिया, अरुणिता कांजिलाल, मोहम्मद दानिश होय. म्हणजेच आता यातील एक स्पर्धक ‘इंडियन आयडल १२’ची ट्रॉफी जिंकणार आहे. अशातच आता शोमधील सर्वात दमदार स्पर्धक असणाऱ्या पवनदीपकडून एक मोठी चूक झाली आहे.

सूर- तालपासून गाण्याचे बोल यांमध्ये कधीही चूक न करणा पवनदीप रविवारी (१८ जुलै) एका एपिसोडमध्ये परफॉर्मन्सदरम्यान अचानकच थांबला. (TV Show Indian Idol 12 Shocking Pawandeep Rajan Forgot The Lyrics of The Song)

होय, अशाप्रकारे पवनदीपला आपले गाणे अर्धवट सोडताना पाहून परीक्षकांसोबतच सर्वांनाच मोठा झटका बसला. तरीही, आतापर्यंत यामागील कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, असा अंदाज लावला जात आहे की, ४ आठवड्यांपूर्वी सवाई भट्टसोबत ‘बॉटम टू’मध्ये पोहोचलेल्या पवनदीपला ही चूक चांगलीच महागात पडू शकते.

ऐंशीच्या दशकातील प्रसिद्ध जोडी धर्मेंद्र आणि अनिता राज यांच्यासमोर पवनदीप ‘होंठों से छूलो तुम, मेरा गीत अमर कर दो’ या गाण्यावर परफॉर्म कतर होता. ‘प्रेमगीत’ या चित्रपटातील हे गाणे राज बब्बर आणि अनिता राज यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. जगजीत सिंग यांनी गायलेले हे गाणे पनवदीप खूपच चांगल्याप्रकारे मंचावर सादर करत होता. त्याच्या आवाजाची जादू स्टेजवर अशाप्रकारे पसरली होती की, शोमधील पाहुणे परीक्षक अनिता राज यांच्या डोळ्यात तो जुना काळ आठवून आनंदाश्रू आले.

सायलीने केली मदत
या परफॉर्मन्सदरम्यान जेव्हा पवनदीपने ‘जब प्यार करे कोई तो देखे केवल मन’ या गाण्याऐवजी ‘देखे यह जीवन’ गायले आणि जसे त्याला आपली चूक समजली, तो लगेच थांबला. तरीही, नंतर शोची दमदार स्पर्धक सायली कांबळेने त्याची मदत केली आणि त्याच्या गाण्याचे बोल गाऊन त्याची मदत केली आणि आठवण करून दिली.

स्पर्धकांसह परीक्षकही झाले दंग
अशाप्रकारे त्याचा अपूर्ण परफॉर्मन्स पाहून शनमुखप्रियासोबतच इतर स्पर्धकही चकित झाले. सोनी टीव्हीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात आपण पाहू शकता की, केवळ स्पर्धकच नाही, तर परीक्षक हिमेश रेशमियापासून अनिता राज, अनु मलिकसह सर्वजण स्टेजवर जे झाले, ते पाहून दंग झाले.

तरीही, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनदीपला पुन्हा एकदा मंचावर गाण्यासाठी संधी देण्यात आली. इतकेच नाही, तर त्याची प्रशंसा करताना धर्मेंद्र यांनी त्याला खास त्यांच्या घरून आलेले पराठेही खाऊ घातले. मात्र, यावेळी प्रश्न उपस्थित राहतो की, तो एकाच टेकमध्ये गाण्यावर जज केले जाणाऱ्या या रियॅलिटी शोमध्ये मिळालेली दुसरी संधी आणि दुर्दैवाने झालेली चूक पवनदीपला जनता दरबारमध्ये महागात पडेल का? कारण, सवाई भट्टसोबत काही आठवड्यांपूर्वी कमी मतं मिळाल्यामुळे पवनदीपला बॉटम टूमध्ये सामील होण्याची वेळ आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-पठडीबाहेरील भूमिका साकारून भूमी पेडणेकरने बनवलीय तिची ओळख; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या रंजक गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.