ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास


सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी वेळ नसतो. मात्र, मनोरंजन क्षेत्रातील कलाकार नेहमीच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आवर्जुन वेळ काढतात. त्यांची फिटनेस पाहून चाहतेही भलतेच प्रभावित होत असतात. असे असले तरीही, स्वत:ला शेपमध्ये ठेवण्यासाठी या कलाकारांना भरपूर मेहनत करावी लागते. मात्र, सामान्य व्यक्तींप्रमाणेच कलाकारांचेही तेलकट पदार्थ खाण्याने वजन वाढते. त्यामुळे कलाकारांच्या करिअरसाठी हे योग्य नाही.

नुकतेच टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता रवी दुबेने एकाच महिन्यात कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन करून दाखवले आहे. यासोबतच त्याने आपला ट्रान्सफॉर्मेशनचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता, जो भलताच व्हायरल होत आहे. या फोटोवर चाहत्यांसोबतच कलाकारही कमेंट्स करत आहेत. रवीने म्हटले आहे की, फिटनेससाठी त्याने केलेला प्रयत्न हा त्याच्यासाठी एक तपश्चर्याच होती, ज्याला त्याने एका आव्हानाप्रमाणे घेतले. सर्वात खास बाब म्हणजे, कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर रवीने आपले वजनही मोठ्या मेहनतीने कमी केले आहे. (TV Serial Jamai Raja Fame Ravi Dubey Lose 10 KG In One Month Fans Are Surprised To See His Transformation Photos)

रवीने शेअर केलेल्या या फोटोत एका महिन्याचे अंतर दिसत आहे. त्याच्या शरीरातही जबरदस्त फरक दिसत आहे. रवीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत लिहिले की, “कोणत्याही सप्लीमेंट आणि प्रोटीन शेक्सशिवाय एका महिन्यात ट्रान्सफॉर्मेशन. मागील महिन्यात १२ जूनला जवळपास अचानक एक शूटिंग स्केड्युल आले, ज्यामध्ये मला खूपच सडपातळ दिसायचे होते.”

त्याने पुढे लिहिले की, “कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे रिकव्हरीनंतर मी प्रोड्युसर मोडमध्ये होतो. मी पंजाबमध्ये होतो, जिथे खानपानामुळे माझे वजन १० किलो वाढले होते. अशामध्ये जेव्हा शूटिंगबाबत समजले, तेव्हा २० दिवसांपेक्षाही कमी वेळात मी लगेच सकाळी वजनाचा व्यायाम आणि सायंकाळी १० किमी धावणे सुरू केले. यासोबतच मी कमी कॅलरीचे जेवणही सुरू केले.”

‘जमाई राजा’ फेम रवीने म्हटले की, “मी कार्डिओचे प्रमाण लक्षात घेत, कोणतेही सप्लीमेंट किंवा प्रोटीन शेक्स घेतले नाही. जवळपास एका महिन्यात १० किलो वजन कमी केले. मला आनंद आहे की, मी काहीतरी ठेवले आहे. मी आपल्या ट्रेनरला धन्यवाद देऊ इच्छितो, ज्यांनी माझ्या स्केड्युलनुसार माझ्यासोबत न थकता काम केले आणि मला ट्रेनिंग दिली.”

“जेव्हा मला शेपमध्ये येण्याची संधी मिळाली, तेव्हा मी हे एका आव्हानाप्रमाणे घेतले. मला हे ऑरगॅनिक पद्धतीने करायचे होते. कारण बॉडी ट्रान्सफॉर्मेशन किंमत वसूल करते. मला प्रोटीन शेक्स कधीच आवडत नव्हते. मला वाटते की, व्यायामासोबतच ऑरगॅनिक जेवण आणि शिस्त दीर्घकाळ फिट राहण्याचा सर्वात टिकाऊ मार्ग आहे. अक्षय कुमार आणि मिलिंद सोमण आपल्यापुढे एक उदाहरण आहेत.”

रवीच्या कारकिर्दीबाबत बोलायचं झालं, तर त्याने ‘जमाई राजा’, ‘सास बिना ससुराल’, ‘जमाई राजा २.०’ वेबसीरिज यांसारख्या शोमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-पठडीबाहेरील भूमिका साकारून भूमी पेडणेकरने बनवलीय तिची ओळख; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या रंजक गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.