‘लागीर झालं जी’ मधला आज्या अर्थातच अभिनेता नितीश चव्हाण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अभिनयासोबतच त्याला डान्सची देखील खूप आवड आहे, हे त्याचे सोशल मीडिया अकाउंट बघून तुमच्याही सहज लक्षात येईल. तो अनेकदा त्याचे डान्स व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे खूप मनोरंजन करत असतो. नुकताच त्याने शेअर केलेला व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.
नितीशने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये तो ‘राजा राणीची गं जोडी’ फेम श्वेता खरातसोबत धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. त्यांनी जिममध्ये केलेला हा डान्स चाहत्यांकडून खूप पसंत केला जात आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स परफेक्ट आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.
हा व्हिडिओ शेअर करत नितीशने कॅप्शनमध्ये “मेक सम नॉईज” असे लिहिले आहे. युजर्स या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. डान्ससोबत त्यांची जोडीही खूप आवडली आहे, असे चाहते कमेंट्सच्या माध्यमातून सांगत आहेत. व्हिडिओवर आतापर्यंत ३ लाख २२ हजाराहून अधिक व्ह्यूज आले आहेत, तर ३० हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. (nitish chavan and shweta kharat’s dance video in gym goes viral)
श्वेता खरातबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत झळकत आहे. यात ती मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या संजीवनीच्या बेस्ट फ्रेंडची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ नाहीये, तर यापूर्वीही या दोघांचे कपल डान्स व्हिडिओ बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ पाहून, त्यांचे अफेअर तर नाही ना? अशा चर्चाही चाहत्यांमध्ये बऱ्याचदा रंगल्या आहेत. मात्र या दोघांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त










