राज कुंद्राच्या सांगण्यावरून अनेक प्रोडक्शन हाऊस बनवत होते पॉर्न व्हिडिओ; ७० पेक्षाही अधिक लोक लागले पोलिसांच्या हाती


अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफ‍ी प्रकरणात झालेल्या अटकेनंतर त्याच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचेच चित्र दिसत आहे. राजला अटक झाल्यानंतर या पॉर्नोग्राफ‍ी प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. मुंबईमध्ये याप्रकारच्या अनेक लहान मोठ्या अनेक पॉर्न रॅकेट्सचा खुलासा झाला आहे. एका माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या हाती एक मोठे यश आले असून त्यांना अशा एका मोठ्या नेटवर्कची माहिती मिळाली आहे. मुंबईमधील अनेक छोटे छोटे प्रोडक्शन हाऊस या नेटवर्कमध्ये सामील आहे. हे प्रोडक्शन हाऊस राजच्या ऍप्प हॉटस्पॉटसाठी काम करतात. मात्र आता हे ऍप्प काढून टाकण्यात आले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार मुंबई पोलिसांच्या हाती जवळपास ७० व्हिडिओ लागले आहेत. हे सर्व व्हिडिओ राज कुंद्राचा माजी स्वीय सहाय्यक असणाऱ्या उमेश कामतने विविध प्रोडक्शन हाउसकडून चित्रित करून घेतले होते.

Photo Courtesy: Instagram/theshilpashetty

शिवाय पोलिसांना ९० असे व्हिडिओ मिळाले आहे, जे फक्त हॉटस्पॉट ऍप्पसाठीच तयार केले होते. हे व्हिडिओ तयार करणारे अनेक लहान लहान प्रोडक्शन हाऊस देखील आता पोलीस चौकशीच्या कचाट्यात सापडले आहे. राज कुंद्रावर फक्त पॉर्न व्हिडिओ बनवण्याचा आरोप नसून, त्याच्यावर वेबसिरीजमध्ये काम मिळण्याचे आमिष दाखवून त्यांना बळजबरी या व्हिडिओमध्ये सहभागी केल्याचा देखील आरोप आहे. या सर्व आरोपांवर राज कुंद्राच्या वकिलाने सांगितले की, ऍप्पचा कन्टेन्ट नक्कीच अश्लील आहे, मात्र पॉर्न नाही. (Mumbai Police recovered 70 porn videos made by small production houses for Raj Kundra app)

सध्या राज कुंद्रा २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत असून, त्याने त्याच्या तपासामध्ये कोणतेही खुलासे केले नाही. मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या विविध बँक अकाऊंटच्या तपशील मागवला असून, त्यांनी त्याच्या घराची देखील झडती घेतली आहे. या झडतीत त्यांना एक सर्व्हर सापडला असून, हा सर्वर सध्या फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे. या सर्व्हरच्या तपासातून ही माहिती मिळू शकते, की याच सर्व्हरच्या मदतीने कंटेंट ऍप्पवर टाकला आहे की नाही.

Photo Courtesy: Instagram/theshilpashetty

या संपूर्ण पॉर्नोग्राफी प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच सुरु केली होती. राज फेब्रुवारीमध्येच अटक देखील झाला असता, मात्र त्यावेळी त्याने स्वतःला वाचवण्यासाठी अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. राज मागील दोन वर्षांपासून हा व्यवसाय करत होता. भारतातील चौकशीपासून वाचण्यासाठी राजने यूकेच्या एका फर्मला त्याचे हॉटस्पॉट हे ऍप्प विकले होते. या फर्मचा मालक राजचा नातेवाईकच आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हिंदी चित्रपटसृष्टीला लाभलेले महान गायक मुकेश; त्यांच्यासाठी राज कपूरांनी म्हटले होते, ‘जर मी शरीर आहे, तर मुकेश…’

-जेव्हा दीपिका पदुकोणला वाटायचं, ‘आयुष्य नाही महत्त्वाचं’, डिप्रेशनच्या दिवसाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.