जान्हवी कपूरने स्टेजवर चुलती महीप कपूरसोबत लावले ठुमके; ‘नदियों पार’ गाण्यावरचा परफॉर्मेंस तूफान व्हायरल


बॉलिवूडमधील लोकप्रिय घराणे म्हणजे कपूर घराणे होय. कपूर कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने लाइम लाईटमध्ये असतं. कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, तर कधी त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळे कपूर कुटुंबातील सदस्य चर्चेत असतात. अशातच संजय कपूर यांची पत्नी महीप कपूर आणि जान्हवी कपूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या दोघी जान्हवी कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांना देखील त्यांचा हा डान्स व्हिडिओ खूप आवडला आहे.

कपूर कुटुंब या दिवसात एका फॅमिली फंक्शनमध्ये गेले आहे. तेथील एक व्हिडिओ महिप कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, महीप कपूर अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत डान्स करत आहे. त्या दोघी ‘रूही’ या चित्रपटातील तिच्याच ‘नदियों पार’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, महिप कपूरने गडद निळ्या रंगाचा स्कर्ट टॉप घातला आहे, तर जान्हवीने देखील नियॉन कलरचा स्कर्ट टॉप घातला आहे. त्या दोघींच्या डान्स स्टेप्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून महिपने लिहिले आहे की, “माझ्या पुतनीने मला फोर्स केला म्हणून मी स्टेजवर तिला साथ दिली.”

त्याच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर जोरदार पसंती मिळत आहे. त्यांच्यावर या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. (Janhvi kapoor dance on stage with mahip kapoor, video get viral)

जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २०१८ मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अलिकडेच तिचा ‘रुही’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. तसेच ती लवकरच ‘गुड लक जेरी’ या चित्रपटात दिसणार आहे. यासोबाच ती करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलनवाज शेख’ कशी बनली संजय दत्तची पत्नी मान्यता? लग्नाआधी करायची ‘सी ग्रेड’ सिनेमात काम

-‘प्रिन्स ऑफ रोमान्स’ अरमान मलिकचे २७ व्या वर्षात पदार्पण; ऐका त्याची आतापर्यंतची टॉप ५ गाणी

-जेव्हा दीपिका पदुकोणला वाटायचं, ‘आयुष्य नाही महत्त्वाचं’, डिप्रेशनच्या दिवसाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.