मागील अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीमधे फक्त आणि फक्त एकाच चित्रपटाची चर्चा सुरु आहे आणि तो चित्रपट म्हणजे एस.एस. राजामौली यांचा ‘आर.आर.आर.’ या मल्टीस्टारर सिनेमामध्ये एनटी रामाराव जूनियर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आलियाचा हा पहिला दाक्षिणात्य सिनेमा असणार आहे. बाहुबलीचे दिग्दर्शक असणाऱ्या एसएस राजामौली यांचा हा सिनेमा म्हणजे भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक ठरणार आहे.
या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी हे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये एनटीआर आणि रामचरण दोघेही गाडीवर बसलेले दिसत आहे. या पोस्टरसोबत या चित्रपटाचे म्युझिकचे हक्क देखील जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भातले एक ट्वीट टी-सिरीजकडून करण्यात आले आहे. संपूर्ण देशातील चित्रपटप्रेमींचे लक्ष या सिनेमाकडे लागले आहे, जो सिनेमा हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतातल्या सर्वात मोठ्या ऍक्शन ड्रामा चित्रपटाचे संगीत हक्क प्राप्त झाल्याचा आनंद टी-सिरीजने ट्वीट करून सर्वांना सांगितला आहे. (RRR movie new poster release TSeries gets music rights of RRR )
'RRR' OFFICIAL POSTER… #RRR #SSRajamouli #RRRAudioOnTseriesLahari #JrNTR #RamCharan #AjayDevgn #AliaBhatt #RRRMovie #Telugu #Hindi #Tamil #Kannada #Malayalam #TSeries #LahariMusic pic.twitter.com/wI8mqnUuqs
— taran adarsh (@taran_adarsh) July 26, 2021
आरआरआर हा सिनेमा एक पिरियड ड्रामा आहे. या चित्रपटात दाखवण्यात येणारी कथा ही भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीची, म्हणजेच १९२० सालच्या आसपासची असणार आहे. यात देशाच्या स्वतंत्रलढ्यात सहभाग घेणाऱ्या अल्लूरी सीतारामा राजू आणि कोमाराम भीम या दोन क्रांतिकारकांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या उत्तर भारतातील वितरणाचे सर्व अधिकार पेन स्टुडिओला मिळाले आहे. हा सिनेमा १३ ऑक्टोबर २०२१ ला प्रदर्शित होऊ शकतो.
Glad to acquire the music rights of India’s Biggest Action Drama, @SSRajamouli’s @RRRMovie ????????????
An @MMKeeravaani Musical
???? on @TSeries & @LahariMusic#RRRAudioOnTseriesLahari#BhushanKumar #TSeries @tarak9999 @AlwaysRamCharan @ajaydevgn @aliaa08 @DVVMovies @PenMovies pic.twitter.com/w59F9XlmD5
— T-Series (@TSeries) July 26, 2021
या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच परदेशातील थिएटर राई्टसह, आतापर्यंत तब्बल ७० कोटींची कमाई केली आहे. बाहुबली सिरीजला मिळालेल्या भरघोस यशानंतर राजामौलींच्या आगामी सिनेमाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ‘आरआरआर’ची घोषणा झाल्यापासूनच या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. या सिनेमाचे बजेट जवळपास ३०० कोटीचे आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राज कुंद्रा प्रकरणाबाबत राखी सावंत झाली व्यक्त; म्हणाली, ‘त्यांनी मला…’