राहुल- दिशाला आशीर्वाद देण्यासाठी किन्नर पोहचले त्यांच्या घरी; नवदाम्पत्यासह डान्स करून केली ‘ईतकी’ मोठी मागणी


‘बिग बॉस’ फेम अभिनेता आणि गायक राहुल वैद्य याने १६ जुलैला अभिनेत्री दिशा परमारसोबत लग्न केले आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा कानावर येत आहेत. लग्नाच्या आधी झालेल्या सगळ्या फंक्शनचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच लग्नाचे आणि लग्नानंतरचे देखील सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांचा गृहप्रवेश, सत्यनारायणाची पूजा हे सगळे समारंभ चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले आहेत. अशातच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राहुल आणि दिशा किन्नरसोबत डान्स करताना दिसत आहेत.

दिशा आणि राहुलला आशीर्वाद देण्यासाठी किन्नर त्यांच्या घरी गेले होते. जिथे त्यांनी डान्स करून नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देखील दिला. यावेळी राहुल आणि दिशा या दोघांनीही नाईट सूट घातलेला होता. किन्नरने राहुल आणि दिशाला असे देखील सांगितले की, ते संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये जातात. त्यांनी राहुल आणि दिशाची दृष्ट देखील काढली. तेव्हा ते म्हणाले की, एवढी चांगली सून आहे, तर इनाम देखील तेवढाच चांगला घेणार.

त्यांनी राहुलकडे सव्वा लाख रुपये आणि सोन्याच्या वस्तूची मागणी केली. यासोबतच त्यांनी सांगितले की, त्यांनी बॉलिवूडमधील अनेक जोड्यांना आणि मुलांना आशीर्वाद दिले आहेत. त्यांनी सांगितले की, ते कपिल शर्मा, अमिताभ बच्चन यांच्या सगळ्यांच्या घरी जातात. (Rahul vaidya and disha Parmar received blessing from kinnar)

राहुल आणि दिशाची लव्ह स्टोरी २०१८ मध्ये सुरू झाली. त्या दोघांनी सर्वात आधी इंस्टाग्रामवर चॅटिंग केली त्यानंतर ते दोघे खूप चांगले मित्र झाले. बिग बॉसच्या घरात असताना राहुलने सर्वांसमोर तिला प्रपोज केले होते. त्याचा तिने स्वीकार देखील केला होता. ते दोघे या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार होते, पण कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यांना तारीख पुढे ढकलावी लागली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लाल कमाल!! सारा अली खानने शेअर केले लाल लेहंग्यामध्ये फोटो; पाहायला मिळालं अभिनेत्रीचं मनमोहक सौंदर्य

-खरंच की काय! ऐश्वर्या राय होणार दुसऱ्यांदा आई? व्हायरल फोटो पाहून सोशल मीडियावर रंगल्यात चर्चा

-‘गुड्डी माझी सर्वात मोठी फॅन होती…’ म्हणत, धर्मेंद्र यांनी जया बच्चनसोबतच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा


Leave A Reply

Your email address will not be published.