अभिनेता अक्षय कुमार हा जितका त्याच्या फिटनेससाठी, चित्रपटांसाठी ओळखला जातो तितकाच तो त्याच्या सामाजिक कार्यांसाठी देखील ओळखला जातो. अक्षय नेहमीच वेगवगेळ्या मार्गाने त्याचे सामाजिक भान जपत लोकांना मदतीचा हात देतो. बऱ्याचदा त्याची मदत मीडियामध्ये येत देखील नाही. आपण जर पाहिले तर अक्षय आपल्या देशाच्या जवानांसाठी खूप काम करताना, त्यांना मदत करताना दिसतो. जवान हा त्याचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. अक्षयने अनेक देशभक्तीपर सिनेमांमध्ये काम केले आहे, तर काही चित्रपटांमध्ये त्याने आर्मीच्या जवानांची भूमिका देखील साकारली आहे. त्यामुळे तो या लोकांचे दुःख खूप जवळून समजू शकतो, म्हणून तो त्यांना सढळ हाताने मदत करतो.
काही दिवसांपूर्वी अक्षय एका सिनेमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने काश्मीरमध्ये पोहचला होता. त्यावेळी तो काश्मीरमधील सीमा सुरक्षा दलाच्या बीएसएफ काश्मीर बेसवर गेला होता. तेव्हा तुलैल तालुक्यातील नीरू गावात अक्षयने एक तुटलेली शाळा पाहिली आणि तिला पुन्हा एकदा उभारण्यासाठी देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी त्याने या शाळेच्या उभारणीसाठी एक कोटी रुपयांची मोठी रक्कम दान म्हणून दिली. (akshay kumar donates rs 1 crore to rebuild a school in kashmir bsf shares a photo)
त्यानंतर २७ जुलै २०२१ रोजी बीएसएफने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या शाळेचे काही फोटो शेअर करत एक माहिती दिली. नुकतीच या शाळेची पायाभरणी करण्यात आली. त्यावेळी या शाळेचे नाव अक्षय कुमारचे वडील स्वर्गीय हरी ओम भाटिया यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. बीएसएफने त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले, “आज काश्मीरमध्ये डीजी BSF राकेश अस्थाना यांनी पद्मश्री अक्षय कुमारसोबत BWWA चे अध्यक्ष अनु अस्थाना आणि SDG वेस्टर्न कमांड BSF सुरेंद्र पंवार यांच्या उपस्थितीमध्ये ‘हरिओम भाटिया एजुकेशन ब्लॉक गवर्नमेंट मिडिल स्कूल नीरू’ शाळेची पायाभरणी केली गेली. जय हिंद.”
DG BSF Sh Rakesh Asthana along with Sh @akshaykumar Padma Shri laid foundation stone of Hari Om Bhatia Education Block at Govt Middle School Niru, Kashmir in presence of Smt Anu Asthana, President BWWA & Sh Surendra Panwar, SDG Western Command BSF through weblink today#JaiHind pic.twitter.com/7lO9VvQ7up
— BSF (@BSF_India) July 27, 2021
अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर अक्षय कुमारचा ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असला तरी कोरोनाच्या संसर्गामुळे प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. याशिवाय अक्षय ‘अतरंगी रे’, ‘बच्चन पांडे’, ‘बेल बॉटम’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘राम सेतु’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










