मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी चित्रपटसृष्टीतली एक प्रतिभावान कलाकार आहे. तिने अनेक चित्रपटात उत्तम कामगिरी करत, रसिकांची मने जिंकली आहेत. चित्रपटातील तिच्या अभिनयाचं अनेकदा कौतुकही झालंय. मात्र तिच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली, तर तुमच्या लक्षात येईल की, तिला अभिनयासोबत कविता लिहण्याची देखील प्रचंड आवड आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ही कला बऱ्याचदा चाहत्यांसमोर सादर करताना दिसते.
स्पृहा जोशीने तिच्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरून तिचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. मात्र या खाली लिहिल्या गेलेल्या काही ओळींनी नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री सोफ्यावर बसलेली आहे. यात तिने पांढरा टॉप, तर काळी जीन्स परिधान केली आहे. तसेच हा एक ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो आहे, ज्यात स्पृहा अतिशय सुंदर दिसत आहे.
फोटोखाली कॅप्शनमध्ये स्पृहा म्हणतेय की, “मिटत जाती दूर रेषा अंतराने आखल्या, खोल काही गर्भवेणा, काळजाने माळल्या…
उडत गेली दूरदेशी जाणिवेची पाखरे, हाय! त्यांच्या सावल्या मी घरकुलातच शोधल्या..
खिन्न हृदयी एकटे माझेच गाणे गुंजते, मग तुझ्यापाशी कशा माझ्या विराण्या पोचल्या??
अंतरीचे वाटणे, तू अंतरातुन जाणणे, मोरपंखी लक्ष दिवल्या पावसाने गोंदल्या..!!”
आता तिचा हा फोटो आणि फोटोखालची कविता दोन्हीही चाहत्यांना चांगलीच भावली आहे. चाहते कंमेट्स करून कौतुकाचे पूल बांधत आहेत. काही मिनिटापूर्वी शेअर केलेल्या या फोटोवर आतापर्यंत २ हजाराहून अधिक लाईक्स आलेले पाहायला मिळत आहेत. (Marathi actress spruha joshi shared her poem on social media)
स्पृहाने ‘मोरया’, ‘पैसा पैसा’ अशा चित्रपटात अभिनय करून बरीच प्रसिद्धी मिळवली. तिने २००४ साली आलेल्या ‘माय बाप’ मधून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. अभिनेत्रीने बऱ्याच नाटकातही काम केले आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’ या रियालिटी शोमध्ये स्पृहा होस्ट म्हणून कार्यरत आहे. शिवाय तिने अलीकडेच ‘रंगबाझ फिरसे’ द्वारे ओटीटीवर देखील पदार्पण केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट
-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट