Monday, September 14, 2026
Home मराठी ‘साथ भिगे बारिश में ये अब मुमकींनं नही…’, अपूर्वा नेमळेकरच्या साडीतील दिलखेचक अदा लावतायेत चाहत्यांना वेड

‘साथ भिगे बारिश में ये अब मुमकींनं नही…’, अपूर्वा नेमळेकरच्या साडीतील दिलखेचक अदा लावतायेत चाहत्यांना वेड

टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांच्या यादीत स्थान मिळवणारी मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’ होय. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपल्या कथानकाने खास स्थान निर्माण केलं. यातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल तर काय बोलावे! कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पाडली. यातलीच एक प्रतिभावान अभिनेत्री आहे अपूर्वा नेमळेकर. अभिनयाव्यतिरिक्त ती तिच्या मनमोहक सौंदर्यासाठीही ओळखली जाते.

अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. ती सतत आपले व्हिडिओ आणि फोटो शेअर करून, चाहत्यांचे लक्ष वेधत असते. चाहतेही तिच्या फोटोवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. बऱ्याचदा तिचे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच तिचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आलं आहे.

अपूर्वाने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यात तुम्ही पाहू शकता की, तिने लाल भडक रंगाची नेसली आहे, सोबतच काळ्या रंगाचं ब्लाऊज घातलं आहे. या साडीलूकला पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने लाल लिपस्टिक आणि कपाळावर लाल टिकलीही लावली आहे. एकंदरित तिचा हा जीवघेणा लूक चाहत्यांना वेड लावण्यासाठी पुरेसा आहे. (ratris khel chale fame apurva nemlekar shared her stunning saree photos on social media)

फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिलंय की, “साथ भिगे बारिश में ये अब मुमकींनं नही, चलो भिगते हैं यादो में
तुम कही….. मैं कही..!!.” अपूर्वाच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहत्यांनी कंमेट्सच्या माध्यमातून तिचे कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. कमेंट बॉक्समध्ये लाल हार्ट आणि फायर ईमोजीचा पाऊस पाडलेला पाहायला मिळत आहे.

अपूर्वाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘आभास हा’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पदार्पण केले होते. त्यानंतर अभिनेत्रीने बऱ्याच मालिकेमध्ये भूमिका साकारल्या. मात्र तिला खरी ओळख ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने मिळवून दिली. याशिवाय अपूर्वाने ‘भाकरखाडी ७ किमी’, ‘इश्क वाला लव्ह’, ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’, आणि ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातही महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

हे देखील वाचा