Wednesday, June 25, 2025
Home कॅलेंडर बापरे! ‘किंग खान’ने मारली होती यो यो हनी सिंगला कानाखाली? वाचा काय झालं होतं नेमकं

बापरे! ‘किंग खान’ने मारली होती यो यो हनी सिंगला कानाखाली? वाचा काय झालं होतं नेमकं

प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग सध्या पत्नीने केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपांवरून चर्चेत आहे. हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि विवाहबाह्य संबंधावरून आरोप लावले आहेत. पण हे तुम्हाला माहिती आहे का? माध्यमांतील वृत्तानुसार, ‘किंग खान’ शाहरुख खानने हनी सिंगच्या कानाखाली वाजवली होती? यावर हनीची पत्नी शालिनीने याबाबत मौन सोडत सत्य सांगितले होते. जाणून घेऊयात शालिनीने काय सांगितलं होतं?

हे होते प्रकरण
सन 2014 मध्ये हनी सिंग सार्वजनिक कार्यक्रम आणि इंडस्ट्रीपासून जवळ जवळ गायब झाला होता. त्यावेळी अशा अफवा आल्या होत्या की, शाहरुख खानने न्यू इयरच्या कार्यक्रमामध्ये हनी सिंगच्या कानाखाली वाजवली होती. त्याला मारण्याचे कारण असे की, हनी सिंगने गैरवर्तणूक केली होती. या घटनेनंतर हनी सिंग कोणत्या कार्यक्रमात नजरेस पडला नाही. असे सांगितले जाते की, हनी सिंगने जास्त मद्यपान केल्यामुळे त्याने शाहरुख खानसोबत गैरवर्तणूक केली होती. याबद्दल शालिनीने मौन सोडले आणि सत्य सांगितले होते.

शाहरुखचा आदर करतो हनी सिंग
झी न्यूजसोबत बोलताना शालिनीने सांगितले होते की, “शाहरूखने हनी सिंगला कानाखाली का वाजवली? या सगळ्या भाकड गोष्टी आहेत. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की, हनी सिंग शाहरुख खानचा खूप आदर करतो आणि शाहरुख सुद्धा त्याला लहान भावाप्रमाणेच त्याच्यासोबत व्यवहार करतो. खरं तर शाहरुखने आम्हाला खूप मदत केली आहे. डॉक्टरांनी हनीला देशाच्या बाहेर न जाण्यास सांगितले होते. परंतु हनीने शाहरुख खानला वचन दिले होते, त्यामुळे त्याला या न्यू इयर टूरवर जावेच लागले.”

रिहर्सलमध्ये पडल्यामुळे लागला मार
शालिनीने सांगितले, “या टूरवर असताना हनी सिंगला बीपीच्या गोळ्या चालू होत्या आणि रिहर्सल करताना तो घसरून पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला आणि पाठीला मार लागला. म्हणून त्याला टूरवरून वापस यावे लागले. त्यामुळे शाहरुख खानने हनीला मारण्याची गोष्ट ही खूप मोठी अफवा आहे.”

महत्त्वाचे असे की, शालिनी आणि हनी सिंगचे लग्न 2011 मध्ये झाले होते. आता शालिनीने पती हनी सिंगवर कौटुंबिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. शालिनीने हनीवर शारीरिक- मानसिक, भावनिक अत्याचार आणि शिवीगाळ केल्याचे आरोप लावले आहेत. दिल्लीतील एका न्यायालयाने हनी सिंगवर लावलेल्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी त्याला 28 ऑगस्टपर्यंत चा वेळ दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’

-तब्बल ५ मिनिटे किसींग सीन दिल्यावर बेशुद्ध झाली होती रेखा; दिग्दर्शकाने कट म्हणूनही थांबला नव्हता अभिनेता

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

हे देखील वाचा