Friday, November 14, 2025
Home मराठी लाडका ‘राणादा’ पुन्हा झळकणार झी मराठीवर; ‘या’ मालिकेद्वारे करतोय दमदार पुनरागमन

लाडका ‘राणादा’ पुन्हा झळकणार झी मराठीवर; ‘या’ मालिकेद्वारे करतोय दमदार पुनरागमन

झी मराठी या वाहिनीवर अनेक नवीन मालिका येणार आहेत, त्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत. या नवीन मालिका नक्की कोणत्या आशयावर असणार आहेत, तसेच यामध्ये नक्की कोणकोणते कलाकार असणार आहेत. याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मागील अनेक दिवसापासून या मालिकांचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण अजूनही मालिकेतील सर्व पात्रांची ओळख पटली नाही.

यापैकी एका मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. तो म्हणजे ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेचा प्रोमो. या प्रोमोमध्ये एक मुलगी सगळे नाते संबंध आठवताना दिसत आहे. तिच्याकडे पाहून असे वाटते की, ती कदाचित स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. परंतु ती नंतर सांगते की, ती संसाराच्या परीक्षेची तयारी करत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत अमृता पवार दिसत आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना आता या कथेची आणि या मालिकेत आणखी कोणते कलाकार असणार आहे. याची उत्सुकता लागली आहे. अशातच ही माहिती समोर आली आहे की, या मालिकेत अमृता पवार सोबत मुख्य भूमिकेत अभिनेता हार्दिक जोशी दिसणार आहे, हे समजल्यानांतर त्याचे चाहते खूप खुश झाले आहेत. (marathi actor hardik joshi will come again on television by this serial )

हार्दिक जोशीने या आधी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ यामध्ये काम केले आहे. या मालिकेमधील त्याचे राणा नावाचे पात्र चांगलेच गाजले होते. ही मालिका संपल्यावर त्याचे चाहते काहीशा प्रमाणात नाराज झाले होते. पण आता त्याचे पुन्हा एकदा झी मराठीवर आगमन होणार आहे. यामुळे प्रेक्षक खूप खुश झाले आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत हार्दिकचा अत्यंत रांगडा अंदाज पाहायला मिळाला. आता या मालिकेत तो नक्की कोणत्या रूपात दिसणार आहे. हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने या मालिकेची वाट पाहत आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ लारा दत्ताचा नाही, तर ‘या’ कलाकारांनी देखील परफेक्ट लूकसाठी घेतला होता प्रोस्थेटिक मेकअपचा आधार

-बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवणारा आदित्य नारायण मुख्य नायकाच्या भुमिकेत ठरला अपयशी; तर ‘या’ वादांशी जोडलं गेलंय त्याचं नाव

-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला

हे देखील वाचा