मुंबईत पावसाळ्याच्या आगमनाने हवामान आल्हाददायक आहे. त्यामुळे अनेक कलाकार पावसाचा आंनद घेताना दिसत आहेत. तर आता बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने त्याची पत्नी कतरिना कैफसोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट होताच चाहत्याचे अनेक प्रतिक्रेया येत आहेत. तर यावर एक चाहत्याने म्हणले आहे की याच्या दोघात खरेच उत्तम प्रेम आहे. हा फोटो चाहत्यांची मने जिंकत आहे.
हि पोस्ट सोशल मिडियावर विक्किने केली आहे. त्यात कतरिनाने विकीच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसत आहे. तर दोघेही समोर पाहत आहेत. विकीने या पोस्टला “पाऊस आणि तू” असे गोड कॅप्शन दिले आहे. यातील त्याच्या पोज असे दिसुन येत आहे की, ते या पावसाळ्या वातावरणाचा उत्तम आंनद घेत आहेत.
विकी (vikcy)कौशल आणि कतरिना याच्या नात्याबाबत पाहले तर एका शोदरम्यान विकीने त्याच्या आणि कतरिनाच्या पहिल्या भेटीबद्दल एक रंजक किस्सा सांगितला होता. त्याने सांगितले की, त्यांची पहिली भेट एका पुरस्कार सोहळ्याच्या बॅकस्टेजवर झाली होती, जिथे कॉमेडियन सुनील ग्रोव्हरने त्यांची ओळख करून दिली होती. नंतर ते दोघे दुसऱ्या एका पुरस्कार सोहळ्यात भेटले, जिथे विकीने गंमतीने कतरिनाला स्टेजवर प्रपोज केले होते. विकीने हसतमुखाने स्पष्ट केले की, प्रत्येक अभिनेत्रीसोबत त्याला करावा लागणारा तो एक स्क्रिप्टेड विनोद होता, पण कतरिनासोबतचा त्याचा व्हिडिओ त्वरित व्हायरल झाला आणि लोकांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली.
यानंतर त्याच्यातील मैत्री वाढत गेली आणि या जोडप्याने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील आलिशान सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा येथे एका खाजगी पण भव्य समारंभात लग्न केले. या लग्नाला फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नानंतर, या जोडप्याने 7 नोव्हेंबर 2015 रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले.
हेही वाचा
गौरी स्प्रॅटसोबत लग्न करणार आमिर खान; कधी, कुठे आणि कशा पद्धतीने होणार विवाह? घ्या जाणुन


