रिॲलिटी शो मधील लोकप्रिय शो म्हणजे रोहित शेट्टीचा ‘खतरों के खिलाडी’. आता या रिॲलिटी शोचा 15 वा पर्व येण्यास सज्ज आहे. या शोची जे चाहते वाट पाहत होते त्याच्यासाठी ही एक आंनदाची बातमी आहे. शनिवारी, कलर्स टीव्हीने शोचे टायटल ट्रॅक शेअर केला आहे. तसेच यातील 13 स्पर्धकांची ओळख करुन दिली आहे. निर्मात्यांनी असेही जाहीर केले आहे की हा शो 25 जुलै पासुन सुरु होईल. तर यावेळी शो मध्ये काही जुने आणि नवे कलाकार सुध्दा असणार आहेत.
रुबिना दिलैक – बिग बॉस 14 ची ती विजेती आहे. रुबिना आता ‘खतरों के खिलाडी’च्या 15व्या पर्वात भाग घेतला आहे. तर करण वाही – करण ‘खतरों के खिलाडी’च्या सर्वात मनोरंजक सीझन, म्हणजेच सीझन 8 चा भाग होता, ऋत्विक धनजानी- करण वाहीचा जिवलग मित्र आणि ‘खतरों के खिलाडी’चा माजी स्पर्धक ऋत्विक धनजानी आहे. या लोकप्रिय रिॲलिटी शोच्या आगामी सीझनमध्ये तो ही दिसणार आहे.
अविका गोर – ‘बालिका वधू’मधील अभिनेत्री अविका गोर, ‘खतरों के खिलाडी’च्या नवीन सीझनमध्ये दिसणार आहे. जस्मिन भसीन- जस्मिन नवीन सीझनमध्ये कशी कामगिरी करते हे पाहणे मनोरंजक ठरेल. तिने सीझन 9 मध्ये ‘खतरों’चा खेळ अनुभवला आहे आणि नंतर 2020 मध्ये ‘खतरों के खिलाडी – मेड इन इंडिया’साठी परत आली होती.
गौरव खन्ना- ‘बिग बॉस 19’ चा तो विजेता आहे, गौरव खन्ना (khanna)’खतरों के खिलाडी’मध्ये आता दिसणार आहे, फरहाना भट्ट- फरहाना शेवटची ‘बिग बॉस 19 मध्ये पहिली उपविजेती म्हणून दिसली होती. तिच्या ‘खतरों’मध्ये सामील होण्याच्या बातमीने तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.
म्हणजेच या शो मध्ये एकुण 13 स्पर्धक असणार आहेत. ऋत्विक धनजानी, करण वाही,जस्मिन भसीन, फरहाना भट्ट, रुबिना दिलैक, अविका गोर, गौरव खन्ना, हर्ष गुजराल, ओरी, रुहानिका धवन, विशाल आदित्य सिंग, अविनाश मिश्रा, शगुन शर्मा हे कलाकार ‘खतरों के खिलाडी या रिॲलिटी शो च्या 15 व्या पर्वात असणार आहेत.
हेही वाचा
गौरी स्प्रॅटसोबत लग्न करणार आमिर खान; कधी, कुठे आणि कशा पद्धतीने होणार विवाह? घ्या जाणुन


