Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड राखाडी साडीमध्ये खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य, ग्लॅमरस लूकला मिळतीये चाहत्यांची पसंती

राखाडी साडीमध्ये खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य, ग्लॅमरस लूकला मिळतीये चाहत्यांची पसंती

आजकाल सोशल मीडिया हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. प्रत्येकजण आपल्या भावना आपल्या आयुष्यातील सुख-दुःख, यश-अपयश आयुष्यातल्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. चित्रपटातील अनेक कलाकारांपासून तर सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करत असतो. आता सोशल मीडिया एक देवाण घेवाणीचे माध्यम झाले आहे. अनेक कलाकारांची ओळख तर सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असते. ते नेहमीच त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर‌ शेअर करून सगळ्या प्रेक्षकांची जोडून राहण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावरील वावर वाढताना दिसत आहे. अशातच तिने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने राखाडी रंगाची नेटची साडी परिधान केली आहे. हा तिने वेलवेटचा स्लिव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे. तसेच तिने मोठे इअररींग्स परिधान केले आहेत. सगळे केस मागे बांधले आहेत. तसेच लावलेल्या लिपस्टिकमुळे ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने यामध्ये वेग वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट तिच्या या लूकचे कौतूक करत आहेत. सगळेजण फायर आणि हार्ट ईमोजी पोस्ट करून तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. (marathi actress prajkta mali’s glamrous photo’s viral on social media )

प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील साध्याभोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. तसेच तिने ‘खो-खो’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे प्राजक्तप्रभा हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ लारा दत्ताचा नाही, तर ‘या’ कलाकारांनी देखील परफेक्ट लूकसाठी घेतला होता प्रोस्थेटिक मेकअपचा आधार

-बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवणारा आदित्य नारायण मुख्य नायकाच्या भुमिकेत ठरला अपयशी; तर ‘या’ वादांशी जोडलं गेलंय त्याचं नाव

-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला

हे देखील वाचा