Tuesday, June 24, 2025
Home हॉलीवूड सेन सेबेस्टियन फिल्म फेस्टिवलमध्ये जॉनी डेप होणार जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

सेन सेबेस्टियन फिल्म फेस्टिवलमध्ये जॉनी डेप होणार जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

मनोरंजन विश्वात कलाकरांना त्यांच्या अतुलनीय आणि भरीव कामगिरीसाठी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते हा गौरव म्हणजे कलाकारांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानाला एक मनाचा सलाम असतो. हा पुरस्कार फक्त आपल्या देशातच दिला जातो असे नाही परदेशातही या पुरस्काराने अनेकांना सन्मानित केले जाते.

हॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते जॉनी डेप लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित केले जाणार आहे. ६९ व्या सेन सेबेस्टियन इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांना हा गौरव प्रदान केला जाईल. जॉनी डेप यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना ‘पाइरेट्स ऑफ द कॅरेबियन’ या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळवून दिली. हा चित्रपट करियरमधील मैलाचा दगड ठरला. सिनेमाने देशातच नव्हे परदेशातही त्यांना ओळख मिळवून दिली. ‘द टूरिस्ट’, ‘ट्रांसेंडेंस’ आदी चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या. (johnny depp will be awarded by lifetime achievement award)

चित्रपटांसोबतच जॉनी डेप सोशल मीडियावरही तुफान लोकप्रिय आहे. त्यांना १० मिलियनपेक्षा अधिक लोकं फॉलो करतात. जॉनी हे अभिनयासोबतच संगीतासाठी देखील ओळखले जातात. ते उत्तम गिटारिस्ट आहे. १९८० साली टेलिव्हिजनवरील ’21 जंप स्ट्रीट’मालिकेने त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. ते अनेक वादांसाठी देखील चांगलेच गाजले. काही दिवसांपूर्वी ते त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत एम्बर हर्डसोबत झालेल्या भांडणामुळे खूपच चर्चेत आले. या भांडणांचा परिणाम त्यांच्या चित्रपटांवरही दिसला आणि त्यांना अनेक मोठ्या आणि चांगल्या सिनेमांमधून बाहेर काढण्यात आले. त्यात वार्नर ब्रोज आणि फैंटास्टिक बीस्ट्स अशा चित्रपटांचा समावेश होता.

 

स्पेनच्या सेन सेबेस्टियन इंटरनेशनल फिल्म फेस्टने त्यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील भरीव योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. याची घोषणा नुकतीच करण्यात आली. यावेळी जॉनी हे आधुनिक चित्रपटांमधील अतिशय प्रतिभावान, हुशार, अष्टपैलू आणि प्रभावी अभिनेते आहे असे सांगण्यात आले.

१७ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या सेन सेबेस्टियन फिल्म फेस्टिवलमध्ये जॉनी यांना हा सन्मान २२ सप्टेंबरला सेन सेबेस्टियनमध्ये प्रदान करण्यात येणार आहे. हा फेस्टिवल २५ सप्टेंबरपर्यंत चालणार असून यादरम्यान अनेक कलाकारांना पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा