दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून वाईट बातमी समोर आली आहे. व्हीजे आणि त्यानंतर अभिनेता बनलेल्या आनंद कन्नन याचे मंगळवारी (१७ ऑगस्ट) निधन झाले आहे. तो ४८ वर्षांचा होता. आनंद मागील बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होता. आनंद हा १९९० चे दशक आणि २००० च्या सुरुवातीला तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा होता. त्याच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता आनंदच्या निधनावर कलाकार शोक व्यक्त करत आहेत. आनंदच्या निधनाची माहिती त्याचा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक वेंकट प्रभूने ट्वीट करत दिली आहे.
वेंकट प्रभूने आनंदचा फोटो शेअर करत ट्वीट करत आपल्या संवेदना व्यक्त केल्या. त्याने लिहिले की, “एक महान मित्र, एक महान व्यक्ती, आता राहिला नाही. तुझ्या आत्म्याला शांती लाभो आनंद कन्नन.” (Tamil Actor Ananda Kannan Dies At 48 Due To Cancer)
A great friend a great human is no more!! #RIPanandakannan my deepest condolences pic.twitter.com/6MtEQGcF8q
— venkat prabhu (@vp_offl) August 16, 2021
अभिनेत्री तसेच नेता असलेली गायत्री रघुरामने आनंदच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. तिने लिहिले की, “इतका प्रेमळ व्यक्ती इतक्या लवकर निघून गेला. आनंद नेहमी हसायचा. तो इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचा.”
So shocked about to hear about #Anandakannan.. sweet person. Gone too soon. My condolences to his family and friends. He smiled always and he made others laugh and smile. Om shanti pic.twitter.com/mJdd1gWuCX
— Gayathri Raguramm ???????????? (@BJP_Gayathri_R) August 17, 2021
अभिनेता अशोक कुमारनेही ट्वीट करत आनंदला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने लिहिले की, “आनंद कन्नन नेहमीच त्या सकारात्मकतेसह आपल्यासोबत राहील, जी त्याने व्यक्त केली होती. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो. कुटुंब आणि चाहत्यांना या दु:खाचा सामना करण्याची ताकद देवो.”
Dear Brother #Anandakannan
You will always live with the positivity you exuded.
Godbless U
Rest in Peace in Godz Abode and spread smiles & positive vibes up there…Prayers for your family & close loved ones to be blessed with the strength to face this predicament
❤ U Brother pic.twitter.com/MIIaLY8PJO
— ACTOR ASHOK KUMAR (@ashokactor) August 17, 2021
आनंदच्या चाहत्यांनीही त्याच्या निधनावर आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. एका चाहत्याने आनंदचा एक जुना फोटो शेअर करत लिहिले की, “विश्वास होत नाहीये की, आनंद कन्नन आता आपल्या राहिला नाही.”
One of the finest anchor.
Can't believe that he is no more …. #RIP #anandakannan pic.twitter.com/BDaqhscpxm— Imadh (@MSimath) August 16, 2021
आनंदने अनेक तमिळ शो होस्ट केले होते. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात सिंगापूर वसंतम टीव्हीमधून अभिनेता आणि सूत्रसंचालक म्हणून झाली होती. यानंतर त्याने सन म्युझिकसोबत व्हिडिओ जॉकी म्हणून काम केले. चित्रपट निर्माता वेंकट प्रभूने त्याच्यासोबत ‘सरोजा’ चित्रपटात काम केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बॉलिवूडमध्ये यशाचे समीकरण बदलावणारी दिग्दर्शक अभिनेता जोडी, म्हणजे डेव्हिड धवन आणि गोविंदा










