Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

पाहावे ते नवलंच! ‘या’ कारणामुळे ‘स्पायडर वूमन’ बनली राखी सावंत; बघून तुम्हीही व्हाल लोटपोट

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री राखी सावंत ही मनोरंजनाचा फुल तडका आहे. जिथे कुठे जाईल तिथे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी ती सोडत नाही. म्हणूनच की काय तिला बॉलिवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ असे संबोधतात. आजकाल तर ती नेहमीच रस्त्यावर, कॉफी शॉपमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात स्पॉट होत असते. ती दिसताच प्रेक्षक तसेच पॅपराजी आपसूकच तिच्याकडे आकर्षित होतात. ती देखील कधीच चाहत्यांना आणि पॅपराजींना नाराज करत नाही. नेहमीच त्यांच्या प्रश्नांची ती उत्तरे देत असते. अशातच राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो व्हिडिओ पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल.

व्हायरल भयानी या लोकप्रिय फोटो ग्राफरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राखी सावंतने चक्क स्पायडर मॅनचे कपडे घातले आहे. राखी सावंत तिच्या हातात एक बॅग घेऊन आली आहे. ती सर्वांना मी स्पायडर वूमन आहे, असे सांगत आहे. तिथे सगळे पॅपराजी उपस्थित असतात. तेव्हा ते तिला म्हणतात की, “राखी जी तुमची जागा तयार आहे.” तिथे गादी अंथरलेली दिसत आहे. ती तिथे जाते आणि त्यावर झोपते. यावर ती म्हणते की, बिग बॉसने तिला बोलावले नाही म्हणून ती उपोषन करत आहे. ती म्हणते की, “बिग बॉस मला बोलावा, तुम्ही मला वचन दिले होते बिग बॉस.” तिचा हा व्हिडिओ पाहून अली गोनी याने कमेंट केली आहे की, “आम्हाला राखी सावंत परत बिग बॉसमध्ये पाहिजे, विषय संपला.” तिचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. (rakhi sawant’s video viral in social media while wearing spider man’s dress)

या व्हिडिओसोबत राखीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती बिग बॉसच्या गाण्यावर सुपर मॅनच्या ड्रेसमध्ये रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्या एका हातात तिची बॅग आणि दुसरी हातात साउंड आहे. तिच्या डान्स स्टेप्स देखील बघण्यासारख्या आहेत. तिचा हा व्हिडिओ अगदी एक तासापूर्वी शेअर केला आहे पण या व्हिडिओला आतापर्यंत दिड लाखापेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. प्रेक्षकांना तिचा हा अवतार जबरदस्त आवडला आहे.

राखी सावंतने अनेक आयटम सॉन्गवर डान्स केला आहे. पण ‘बिग बॉस’नंतर तिला खूप ओळख मिळाली. नुकतेच तिचे ‘ड्रीम में एन्ट्री’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. यासोबत सध्या ती सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच

-अफगाणिस्तानातली हृदयद्रावक परिस्थिती पाहून बॉलिवूडही झाले स्तब्ध; सुनील शेट्टी ते कंगनापर्यंत कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया

-‘तुझे बोलणे ऐकूण कानातून रक्त येते’, ट्रोलर्सची ही कमेंट पाहून अनन्या पांडेने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा