काही कलाकार असे आहेत, जे आज जरी आपल्यात उपस्थितीत नसले तरीही त्यांच्या कामाच्या सुगंधाने ते नेहमीच आपल्यात असल्याचा भास होतो. असंच त्यांच्या कामाच्या सुगंधाने आपल्यात आजही दरवळत राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत. निशिकांत कामत यांना आज मंगळवारी (१७ ऑगस्ट) या जगातून निरोप घेऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. त्यांनी बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यातच आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
निशिकांत यांचा जन्म १७ जुलै १९७० मध्ये मुंबई येथे झाला होता. त्यांचा मृत्यू मागच्या वर्षी १७ ऑगस्ट २०२० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी झाला. त्यांना यकृतासंबंधित आजार होता. त्यांचा हा आजार वाढल्याने त्यांचा रुग्णालयात उपचार चालू असतानाच मृत्यू झाला. मृत्यूच्या २ वर्षे आधीपासूनच ते या आजाराशी झुंज देत होते.
अशातच त्यांच्या अगदी जवळचा मित्र रितेश देशमुख याने सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीला त्याचा आणि निशिकांत कामत यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्यासोबत जिनिलिया देखील दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “मिस यू मित्रा, तू जिथे कुठे आहे, प्लिज समजून घे की, माझे तुझ्यावर शब्दांपलीकडे प्रेम आहे.” यासोबत त्याने या फोटोला ‘लय भारी’ मधील ‘माऊली माऊली’ हे गाणे लावले आहे. (riteish deshmukh share a post while remembaring nishikant kamat on his first death anniversary)
निशिकांत कामत यांनी सर्वात पहिल्यांदा ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर त्यांनी ‘दृश्यम’, ‘रॉकी हँडसम’, ‘मदारी’, ‘मुंबई मेरी जान’, ‘फोर्स’, ‘लय भारी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. निशिकांत कामत हे बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीचे दिग्दर्शक होते. त्यांचे सगळेच चित्रपट हिट झाले आहेत. आज त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच