प्रत्येक आई- बापाला आपल्या मुलाची काळजी असते, हे सर्वश्रुत आहे. आपला मुलगा लहानाचा मोठा होईपर्यंत आई- वडील त्याच्यासाठी झटत असतात. मात्र, जेव्हा तो आपल्यापासून काही काळासाठी का होईना, जेव्हा दूर जातो, तेव्हा मात्र आई- बापाला काळजी वाटल्याशिवाय राहत नाही. आता असेच काहीसं झालंय बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासोबत. मलायकाने आपला मुलगा अरहान खानसाठी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. तिने एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, “एका नवीन प्रवासावर.” या पोस्टमध्ये तिने आपल्या मुलाला स्वप्न पूर्ण करण्यासाठी सांगितले आहे.
मलायकाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “आपण दोघे एका नव्या आणि अनोळखी प्रवासावर जात आहोत, जो भीती, उत्साह, अंतर आणि नवीन अनुभवांनी परिपूर्ण आहे. मला फक्त एवढंच माहिती आहे की, मला तुझा अभिमान आहे. माझा अरहान.”
“ही तुझ्यासाठी पंख पसरण्याची वेळ आहे. उंच भरारी घे. आपल्या सर्व स्वप्नांना जग,” असे पुढे बोलताना मलायका म्हणाली.
पोस्टसोबत शेअर केलेल्या फोटोत दोघे माय- लेक खिडकीजवळ उभे होऊन बाहेर पाहताना दिसत आहेत. तरीही, या पोस्टमध्ये हे स्पष्ट केले नाही की, मलायका, अरहानच्या कोणत्या प्रवासाबद्दल बोलत आहे. मलायकाच्या या पोस्टला कुटुंबातील व्यक्ती आणि चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. (Actress Malaika Arora Gets Emotional As Son Arhaan Khan Embarks On New Journey)
मलायकाच्या या पोस्टवरून अंदाज बांधला जात आहे की, अरहान मुंबईच्या बाहेर जात आहे. त्यामुळे तिने एका नवीन प्रवासाबाबत लिहिले आहे. असेही म्हटले जात आहे की, तो उच्च शिक्षणासाठी मुंबईच्या बाहेर जात आहे. अरहान आता १८ वर्षांचा आहे. मलायकाने अरहानचा आपल्या कुत्र्याला मिठी मारतानाचाही फोटो शेअर केला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला मलायकाने खुलासा केला होता की, तिच्या मुलाने १२वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गॅप इअर निवडले होते. तिने म्हटले होते की, “मी स्पष्ट होते की, जर अरहान गॅप इअर निवडतोय, तर त्याने आपल्या वेळेचा चांगल्याप्रकारे वापर केला पाहिजे. मी त्याला विविध गोष्टींशी जोडण्यास सांगितले आहे.”
मलायकाने म्हटले होते की, अरहानला काही नवीन शिकायचंय. तसेच आपला वेळ वाया घालवायचा नाही. यावरून अंदाज लावला जात आहे की, अरहान आता मुंबईच्या बाहेर शिक्षणासाठी जात आहे.
मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांनी १९९८ मध्ये लग्न केले होते. त्यानंतर सन २०१७ मध्ये दोघेही विभक्त झाले होते. नुकतेच मलायका, अरहान आणि अरबाजला फॅमिली लंचदरम्यान एकत्र स्पॉट करण्यात आले होते. सध्या मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच