सत्य घटनेवर आधारित चित्रपट हे खूपच भीतीदायक असतात. हॉरर चित्रपटांचा उल्लेख जरी केला, तरी काहींच्या शरीराचा थरकाप उडतो. याउलट बरेच लोक असेही आहेत, ज्यांना हॉरर चित्रपट पाहणे आवडते. जर एखादा हॉरर चित्रपट सत्य कथेने किंवा जुन्या दिवसात घडलेल्या घटनेने प्रेरित असेल, तर बरेचजण ते अधिक आवडीने पाहतात. आज या लेखातून हॉलिवूडच्या अशाच काही हॉरर चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात, जे खऱ्या घटनांवर आधारित आहेत.
द एक्सोरिस्ट
साल १९७३ मध्ये रिलीझ झालेल्या या हॉलिवूड चित्रपटाने भल्याभल्यांना गार केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन विल्यम फ्रिडकिन यांनी केले होते. हा चित्रपट विल्यम पीटर ब्लॅटीच्या याच नावाने लिहिलेल्या कादंबरीवर आधारित होता. हा चित्रपट एका अशा व्यक्तीवर केंद्रित आहे, ज्याच्यात अनेक आत्मा वास करतात आणि प्रीस्ट त्या व्यक्तीला वाचवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करतात. चित्रपटाची अनेक सीन अत्यंत भीतीदायक आणि हिंसक आहेत. असे सीनही यात आहेत, जे बघून हृदयाचा ठोकाच चुकतो. (These are Hollywood movies, based on true events)

पॅरानार्मल ऍक्टिविटीज
साल २००७ मध्ये आलेल्या ‘पॅरानार्मल ऍक्टिविटीज’ या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओरेन पेल्ली यांनी केले होते. हा चित्रपट एका जोडप्याबद्दल होता ज्यांना त्यांच्या घरात काही अतिउच्च अशा नैसर्गिक क्रिया घडत असल्याचे जाणवते. त्यानंतर ते दोघे ठरवतात की, ते या घटना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करतील. असा हा चित्रपट आहे.

सायलेंट हाउस
अभिनेत्री एलिझाबेथ ओल्सेनचा हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट एका महिलेच्या अलौकिक शक्तींसह तिच्या घराच्या आत अडकलेल्या दुःखदायक अनुभवाची कथा सांगतो. ही कथा उरुग्वेमध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ख्रिस केंटिस आणि लॉरा लाऊ या जोडीने केले होते.

द ब्लेअर विच प्रोजेक्ट
साल १९९९ मध्ये आलेला हॉलिवूड हॉरर चित्रपट ‘द ब्लेअर विच प्रोजेक्ट’ हा एका वास्तविक घटनेवर आधारित होता. या चित्रपटात तीन तरुण चित्रपट निर्मात्यांची कथा सांगितली गेली आहे, जे काली पहाडीत लपतात, पण नंतर गायब होतात.

नंतर, या मुलांचे काही व्हिडिओ आणि ध्वनी उपकरणे तेथे सापडतात, ज्याच्या आधारावर पोलीस त्यांचा शोध घेतात. सुमारे एक वर्षानंतर तिथून या मुलांचे फुटेज रिकव्हर केले जाते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम
-‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी










