उत्कृष्ट सूत्रसंचालिका, अभिनेत्री आणि उत्कृष्ट कवयित्री म्हणून लोकप्रिय असणारी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी होय. अनेक मालिकांमध्ये, चित्रपटात काम केल्यानंतर प्राजक्ताचे अभिनय क्षेत्रात एक वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. आलेल्या प्रत्येक भूमिकेला तिने न्याय दिला आहे. कदाचित म्हणूनच ती चाहत्यावर्गात सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या देखण्या आणि सोज्वळ रूपाचे दर्शन ती तिच्या चाहत्यांना वारंवार देत असते. अशातच तिचा एक भुरळ घालणारा फोटो व्हायरल होत आहे.
प्राजक्ताचे तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा साडीतील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पिवळ्या रंगाची प्लेन साडी नेसलेली आहे. यावर तिने निळ्या रंगाचा बलून स्लीव्हज ब्लाऊज घातला आहे. तसेच कमरेला ब्लाऊजला मॅचिंग असा बेल्ट लावला आहे. सोबतच गळ्यात नेकलेस आणि इअरिंग घातले आहेत. या फोटोमध्ये ती अगदी सुरेख दिसत आहे. (Marathi actress Prajakta mali’s yellow saree look photos viral on social media)
हे फोटो शेअर करून प्राजक्ताचे एक कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले आहे की, “इतनी सी है जिंदगी, पर ख्वाब बहुत है. जुर्म तो पता नहीं, पर इल्जाम बहुत है!” तिचा हा लूक आणि हे कॅप्शन तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. या फोटोवर तिचे अनेक चाहते कमेंट करत आहेत. एकाने “खूप गोड प्राजू,” अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका चाहत्याने “ही शायरी तुला शोभते, वाह प्राजक्ता वाह,” अशी कमेंट केली आहे. तिच्या या फोटोला ६३ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.
प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील साध्याभोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर तिने राज्य केले. तसेच तिने ‘खो-खो’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण
-Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’
-जेव्हा शाहरुख खानला महिला चाहती म्हणाली होती, ‘आय लव्ह यू अक्षय’; रंजक आहे ‘तो’ किस्सा