Monday, March 16, 2026
Home बॉलीवूड नताशा स्टॅन्कोविकने शेअर केला जबरदस्त डान्स व्हिडिओ; मूव्ह्ज पाहून तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है!’

नताशा स्टॅन्कोविकने शेअर केला जबरदस्त डान्स व्हिडिओ; मूव्ह्ज पाहून तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है!’

भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक हे एक लोकप्रिय कपल आहे. नताशा आणि हार्दिक सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. यासोबत ती स्वतःचे आणि तिच्या लाडक्या मुलाचे फोटो शेअर करताना दिसते. अलीकडेच, नताशाचा एक डान्सचा व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नताशा तिच्या घराच्या बागेत ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

नताशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना नताशाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “घरासोबत मोजे मॅच होत आहेत.” चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत. नताशाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि आतापर्यंत या व्हिडिओला ८० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

व्हिडिओमध्ये नताशाने राखाडी रंगाचा ट्रॅकसूट परिधान केला आहे, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नताशा जबरदस्त डान्स करत आहे. ती कायम तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ग्लॅमरस फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नताशाचा हा जबरदस्त डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. अनेकांनी या व्हिडिओवर हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

आजकाल ट्रेंडिंग रीलमुळे इंस्टाग्रामवर युजर्सचा वावर वाढत आहे. यात सेलिब्रिटींनी तरी मागे का राहावे? नताशा स्टॅन्कोविकच्या या व्हिडिओवर चाहते प्रचंड प्रतिक्रिया देत आहे. चाहत्यांसोबत सेलेब्सही तिच्या डान्सचे कौतुक करत आहेत. दुसरीकडे, नताशाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘सत्याग्रह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘बिग बॉस ८’च्या पर्वातून प्रचंड चर्चेत आली.

भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याने १ जानेवारी २०२० ला आपली गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविकने हिच्याशी साखरपुडा केला. तेव्हापासून तिचं नाव सगळीकडे चांगलंच चर्चेत होतं. नताशा जरी मूळची सर्बियन असली, तरी ती मुंबई-स्थित मॉडेल आहे. नताशा अभिनेत्री बनण्यासाठी २०१२ साली मुंबईमध्ये आली. प्रसिद्ध संगीतकार बादशाहच्या ‘डीजेवाले बाबू’ या म्युझिक व्हिडीओमुळे ती अधिक प्रकाशझोतात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट

-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’

-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण

हे देखील वाचा