टेलिव्हिजनवरील ‘कॉमेडी सर्कस’ या शोमधून लोकप्रिय झालेला अभिनेता आणि कॉमेडियन सिद्धार्थ सागर याने त्याच्या विनोदी अभिनयाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. परंतु आता त्याच्याबाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार सिद्धार्थला ड्रग्ज घेण्याची सवय लागली आहे. पोलिसांनी नुकतेच त्याला नशेत पडकले आणि त्यांनी त्याच्या आईला कॉल करून त्याची परिस्थिती सांगितली.
पोलिसांनी ही बातमी दिल्यानंतर त्याच्या आईने त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे आता त्याच्यावर इलाज चालू आहे. सिद्धार्थ सागरच्या आईने त्यांच्या मुलाच्या या परिस्थितीबाबत बोलताना सांगितले की, तो बायपोलर डिसऑर्डर या आजाराशी झुंज देत आहे. सिद्धार्थ सागराची आई म्हणते की, “मला पोलीस स्टेशनमधून फोन आला होता की, सिद्धार्थची परिस्थिती खराब आहे आणि त्याला फक्त माझा नंबर आठवत होता. त्याने मला इथून घेऊन जा असे सांगितले.”(Comedy circus fame Siddharth sagar admitted to rehab center as again got addicted to drugs )
त्याच्या आईने पुढे सांगितले की, “ही खूप दुःखाची गोष्ट आहे की, जेव्हा केव्हा तो अशा परिस्थितीत असतो तेव्हा त्याचा कोणताही जवळचा मित्र किंवा शुभचिंतक आमच्या मदतीला येत नाही. त्यावेळी त्याच्यासोबत नेहमी त्याचे आई-वडील असतात. माझी अशी इच्छा आहे की, तो लवकरात लवकर या स्थितीमधून बाहेर पडावा.” २०१८ मध्ये पहिल्यांदा सिद्धार्थ सागर ड्रग्ज घेतो ही माहिती समोर आली होती. तेव्हा मीडियासोबत बोलताना सिद्धार्थ सागरने त्याच्या परिवारावर आणि आईवर अनेक गंभीर आरोप लावले होते.
त्याचे असे म्हणणे होते की, त्याची आई त्याला ड्रग्ज देते. यासोबत त्याने त्याच्या आईवर मारहाण, मानसिक छळ आणि त्याला कैद करून ठेवल्याचे गंभीर आरोप लावले होते. सिद्धार्थ त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप चर्चेत राहिला आहे. त्याच्या लव्ह लाईफमुळे देखील तो चर्चेत होता. त्याची गर्लफ्रेंड सुबोहीने त्याच्यावर अत्याचाराचा आरोप लावला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडचं काळं सत्य आणलं बाहेर; म्हणाले, ‘इथं एवढं जोरात मारलं जातं की…’










