Tuesday, June 9, 2026
Home बॉलीवूड बलात्कार पीडितेच्या नावाचा केलेला खुलासा केल्याप्रकरणी अक्षय- सलमानसह ३८ कलाकारांवर गुन्हा दाखल

बलात्कार पीडितेच्या नावाचा केलेला खुलासा केल्याप्रकरणी अक्षय- सलमानसह ३८ कलाकारांवर गुन्हा दाखल

कलाकार नेहमीच समाजाचा आरसा असतात. अनेक लोकं कलाकरांना किंबहुना ‘सेलिब्रिटी’ या कॅटेगिरीमध्ये येणाऱ्या सर्वानाच आपला आदर्श मानतात आणि त्यांचे अनुकरण करतात. जेव्हा या सेलेब्रिटींवर एवढी मोठी जबाबदारी असते, तेव्हा त्यांनी किती सांभाळून कोणतेही काम केले पाहिजे याचाच अंदाज सामान्य व्यक्तीला देखील येईल. मात्र जेव्हा हे सेलिब्रिटी चुकतात तेव्हा? नुकतेच या सेलिब्रेटींकडून झालेली एक चूक उघड झाली असून आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ साली हैद्राबादमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजवली होती. या भयानक घटनेत एका २६ वर्षाच्या मुलीवर चार व्यक्तींनी सामुहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. सोशल मीडियावरही आम पासून खासपर्यंत सर्वानीच पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. यामध्ये काही बॉलिवूड कलाकारांचासुद्धा समावेश होता. मात्र काही कलाकारांनी केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी पीडित मुलीच्या नावाचा खुलासा करत आणि काहींनी तिचे फोटो शेअर करत तिची ओळख सार्वजनिक केली होती. याच कारणामुळे आता ३८ कलाकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीमधील वकील गौरव गुलाटी यांनी पोलिसांकडे या सर्वांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या ३८ लोकांमध्ये बॉलिवूड कलाकारांसोबत टॉलिवूड अभिनेते, क्रिकेटपटू, आरजे यांचा समावेश आहे. गौरव गुलाटी यांनी ही तक्रार दाखल करताना सांगितले की, कलाकार हे लोकांसाठी एक उदाहरण बनले पाहिजेत, पण ते स्वत: जर कायद्याची पायमल्ली करून बलात्कार पीडितेची ओळख उघड करत असतील तर या सर्व सेलिब्रिटींना अटक झाली पाहिजे.

या ३८ कलाकारांच्या यादीत सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण, अभिषेक बच्चन, फरहान अख्तर, अनुपम खेर, परिणीती चोप्रा, दिया मिर्झा, स्वरा भास्कर, रकुल प्रीत सिंग, यामी गौतम, ऋचा चढ्ढा, काजल अग्रवाल, शबाना आझमी, हंसिका मोटवानी, प्रिया मलिक, अरमान मलिक, करणवीर वोहरा, दिग्दर्शक मधुर भांडारकर, दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजा, अल्लू शिरीष, क्रिकेटपटू हरभजन सिंग, शिखर धवन, निधी अग्रवाल, चार्मी कौर, आशिका रंगनाथ आणि आरजे सायमा यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

हैदराबादमध्ये २८ नोव्हेंबर २०१९ च्या रात्री एका वेटनरी डॉक्टरचे अपहरण करून ४ आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार करत नंतर तिला जिवंत जाळले होते.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हाय गर्मी! अमृता खानविलकरच्या हॉट फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, एकदा पाहाच

-जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट

-राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे

 

हे देखील वाचा