अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande0सध्या तिच्या ‘पवित्र रिश्ता २.०’मुळे चांगलीच चर्चेत आहे. या शोचे प्रमोशन करताना तिने तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबतच्या (sushant singh rajput) आठवणींना उजाळा दिला आहे. एका मुलाखतीमध्ये अंकिताने सुशांतसोबत झालेल्या पहिल्या भेटीची आठवण कशी होती याबद्दल सांगितले. अंकिताने तिच्या आणि सुशांत सिंग राजपुतसोबतच्या पहिल्या विचित्र भेटीबद्दल सांगितले आहे.आज १४ जून रोजी सुशांत सिंगला या जगाचा निरोप घेऊन दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्त जाणून घेऊयात काही खास माहिती.
एका मुलाखतीमध्ये बोलताना, अंकिताने सुशांतसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले, यावेळी अंकिताने ही भेट खूप विचित्र झाली असल्याचे सांगितले. “सुशांत शाहीर सारखा खूप शांत आहे. तो फक्त त्याचे काम करायचा. सुशांतने स्वतः मोठ्या संघर्षाने यश मिळवले होते. मला आठवते की, आम्हाला प्रोमो शूटसाठी जायचे होते आणि सुशांत मला माझ्या घरी न्यायला आला होता. त्यावेळी माझी आई सुद्धा तिथे होती. मला आठवते की, मला उशीर झाला होता. माझे केस आणि मेकअप सकाळी ४ वाजल्यापासून केले जात होते. सुशांत माझ्याजवळ आला होता.”
पुढे अंकीता म्हणाली की, “मला उशीर झाल्यानंतर सुशांत खूप चिडला होता. मी सकाळी ६ वाजता खाली आले त्यावेळी सुशांत खूप चिडलेला होता. खाली आल्यानंतर मी आईसोबत गाडीच्या मागच्या सीटवर बसले आणि झोपून गेले. त्याला याचा इतका राग आला की आधी मी उशिरा आले आणि मग मागच्या सीटवर झोपून गेले. यानंतर त्याने ड्रायव्हरकडून गाडी घेतली आणि ड्रायव्हिंग केले. तो हे का करत होता हे मला समजले नाही. मात्र, माझी आई मला म्हणाली की, त्याला खूप राग येत होता.”
अंकिता-शाहीर पवित्र रिश्ता २.० मध्ये दिसणार दरम्यान, अंकिता पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या पर्वामध्ये दिसणार आहे. यावेळी या मालिकेमध्ये पुनरागमन करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. या मालिकेमध्ये अंकिता लोखंडे ही अर्चना आणि शाहीर शेख हा मानवच्या भूमिकेत दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही नक्की वाचा-
- ‘या’ कारणामुळे डिप्रेशनमध्ये होता सुशांत सिंग राजपूत, क्रिती सेननचा मोठा खुलासा
- ‘अभिनेता हा नेहमीच अभिनेता असतो, जबाबदारीचे ओझे निर्मात्याच्या खांद्यावर असते’ दिया मिर्झाचे मोठे वक्तव्य
- ‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा