आजच्या काळात सोनू सूद केवळ सोशल मीडियावरच वर्चस्व गाजवत नाही, तर तो अनेक लोकांसाठी प्रेरणा ठरला आहे. लॉकडाऊनमध्ये सोनू सूदच्या योगदानामुळे तो लोकांसाठी देवदूत बनला आहे. त्याने सामान्य माणसांसाठी, गरिबांना मदत करण्यापासून जे काही केले त्यासाठी त्याचे जे कौतुक केले जाते, त्यासाठी तो पात्र आहे. कोरोना काळात लोकांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी नेण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली. यासह, सोशल मीडियावर लोकांची दुर्दशा जाणून घेत त्याने त्यांना अनेक सुविधा दिल्या. अलीकडेच, सोनू सूद पुन्हा त्यांच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे.
सोनू सूदने थ्रोबॅक फोटो केला शेअर
सोनू सूदने नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करताना सोनू सूदने सांगितले की, हा त्याचा पहिला पोर्टफोलियोचा फोटो आहे. या फोटोत तो गडद रंगाचा बनियान घातलेला दिसत आहे आणि त्याच्यावर पिवळा उजेड पडलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने हा त्याचा पहिला ऐतिहासिक फोटो असल्याचे सांगितले आहे.
यापेक्षा चांगला फोटो नाही मिळू शकत
हा फोटो शेअर करताना सोनू सूदने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे माझ्या तथाकथित ऐतिहासिक पोर्टफोलियोचा फोटो आहे. मला वाटते की, यापेक्षा चांगला फोटो असू शकत नाही. यात शंका नाही की, माझा मेंदू मागच्या बाजूच्या स्टँडप्रमाणे काम करत होता. जो विना बल्बचा आहे
फराह खानने दिली मजेशीर प्रतिक्रिया
सोनू सूदच्या या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोनू सूदची मैत्रीण आणि दिग्दर्शक फराह खानने अभिनेत्याच्या फोटोवर प्रतिक्रिया देत लिहिले की, “हा फोटो शानदार आहे.” फराह खानव्यतिरिक्त, बिग बॉसच्या माजी स्पर्धक रिद्धिमा पंडितने “हाहाहाहा त्याची कॅप्शन,” अशी प्रतिक्रिया दिली. याशिवाय सोनल चौहान, करिश्मा तन्नासह अनेक कलाकारांनी सोनू सूदच्या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दिसला होता इडली-वडे विकताना
अलीकडेच सोनू सूदने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात तो इडली-वडा विकताना दिसला. या व्हिडिओमध्ये सोनू जहरुद्दीन नावाच्या व्यक्तीला त्याच्या हातगाड्यातून इडली- वडा खाताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सोनू गाड्याचे मालक जरुद्दीनशी बोलतानाही दिसत आहे. सोनू व्हिडिओमध्ये गाड्याच्या मालकाशी बोलत आहे की, “दररोज तुम्ही तुमच्या हातगाड्यामधून लोकांना खाऊ घालता, आज मी तुम्हाला खाऊ घालत आहे. तुम्ही आज व्हीआयपी आहात.”
सोनू नेहमी मदतीसाठी पुढे असतो
सोनू सूद सामान्य लोकांना मदत करताना दिसला आहे, हे पहिले प्रकरण नाही. तो लॉकडाऊन दरम्यान आणि आताही लोकांना सतत मदत करत आहे. त्याच्या या सवयीमुळे त्याला लाखो लोक पसंत करतात. त्याचे चाहते कधी त्याची तुलना सुपरहिरोशी करतात, तर कधी त्याला देवाचा दर्जा देतात.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अक्षयच्या आईच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी लिहिलं भलं मोठ्ठं पत्र; वाचून अभिनेताही झाला भावुक
-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट
-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक










