Saturday, August 29, 2026
Home बॉलीवूड यशला मिळाला किच्चा सुदीपचा पाठिंबा, टॉक्सिक बाबत म्हणाला, अशी रिस्क पत्करण्यासाठी जिगर लागतो

यशला मिळाला किच्चा सुदीपचा पाठिंबा, टॉक्सिक बाबत म्हणाला, अशी रिस्क पत्करण्यासाठी जिगर लागतो

सर्वाधिक प्रतिक्षीत असणारा चित्रपट म्हणजे ‘टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्स’ हा नुकताच प्रदर्शित झाला असुन या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होउन तीन दिवस झाले आहेत. म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 100 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. तसेच सोशल मीडियावर अनेक युझर्स यशच्या अभिनयाचे आणि चित्रपटाच्या भव्य निर्मितीचे कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर करत आहेत. आणि आता यावर अभिनेता किच्चा सुदीप यांनीही आपले मत व्यक्त केले आहे, आणि यशचे कौतुक केले आहे.

अभिनेता किच्चा सुदिपने (sudeep)त्याच्या एक्स हँडलवर यश आणि टाॅक्सिचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहले आहे की, यश मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की, तुझ्या शेवटच्या व्यावसायिक ब्लाॅकबस्टरनंतर तु एक उत्तम काम आणि काहितरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहेस. असं काहीतरी करण्यासाठी एक वेगळी मानसिकता, दृढनिश्चय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, धैर्य आणि जिद्द लागते आणि त्यासाठी तुंझ खुप कौतुक आहे. आणि पुढे म्हणले आहे की, तु असं काहीतरी वेगळं दाखवल्यामुळे तुझे धन्यवाद.

‘टॉक्सिक’च्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. जरी या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जास्त कमाई केली नसली तरी अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने जगभरात 221 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली असून, परदेशातील कमाई 232.5 दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त आहे.

हेही वाचा

ए.आर. रहमान यांनी शेखर कपूर यांच्या मासूम: द नेक्स्ट जनरेशनसाठी तीन गाणी केली रेकॉर्ड

हे देखील वाचा