Monday, March 16, 2026
Home बॉलीवूड फिगर दाखवण्याच्या नादात मलायकाची बदलली चाल, पाहून नेटकऱ्यांनी दिली ‘ही’ उपमा

फिगर दाखवण्याच्या नादात मलायकाची बदलली चाल, पाहून नेटकऱ्यांनी दिली ‘ही’ उपमा

बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि कमनीय बांधा असणारी अभिनेत्री कोण? असा जर कोणी तुम्हाला प्रश्न विचारला तर सर्वात आधी तुमच्या डोक्यात मलायका अरोरा हे एकच नाव येणार. किंबहुना तुम्हीच का सर्वांच्या डोक्यात हेच नाव येणार. वयाच्या चाळीशीनंतरही मलायकाचा हा फिटनेस खरंच वाखाणण्याजोगा आहे. मलायका दोन गोष्टींमुळे सतत चर्चेत येते आणि त्या दोन गोष्टी म्हणजे एका तर तिचा फिटनेस आणि दुसरे म्हणजे अर्जुन कपूर.

मलायका तिच्या फिटनेसबद्दल खूपच डेडिकेटेड आहे. न चुकता दररोज ती जिम आणि योगा करते. तिला अनेकदा योगा क्लासला जाताना मीडियावाले स्पॉट करतात. त्याचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसतात. नुकताच तिचा एका व्हिडिओ व्हायरल झाला असून, या व्हिडिओमध्ये ती गाडीतून उतरून क्लासला जाताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. मलायका अरोरा योगा क्लासमध्ये जात असतांनाच ती फोटोग्राफर्सला पोज देण्यासाठी थांबली. त्यानंतर जेव्हा ती निघाली तेव्हा तिची चालण्याची स्टाईल खूपच विचित्र आणि विनोदी होती. स्टाईल आणि पोज देण्याच्या नादात तिची ही चाल बदलली.

मलायकाचा हा व्हिडिओ पाहून तिला ट्रोल करणाऱ्या यूजर्सने कमेंट्समध्ये म्हटले आहे की, ‘स्वतःची पाठ दाखवण्याच्या नादात ती असे करते. तिची चाल बदकासारखी दिसत आहे.’ अजून एकाने लिहिले आहे की, ‘स्टाईल मारता मारता तिची चाल चुकली.’ तर, एकाने लिहिले, ‘अरे यार ही कशी चालत आहे. ती असे का करत आहे?’ अशा असंख्य कमेंट्स तिच्या या व्हिडिओवर येत आहेत.

नुकताच मलायका आणि अर्जुनाचा एका व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते दोघं डिनर करून हॉटेलच्या बाहेर पडताना दिसले. मलायका आणि अर्जुन अनेकदा मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद होताना दिसतात. फॅन्सला त्यांची जोडी खूप आवडते. वयात मोठे अंतर असूनही ते दोघं त्यांच्या नात्यात सुखी आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाळेची फी भरण्यासाठी गुलशन ग्रोव्हर यांनी विकली डिटर्जेंट पावडर, मोठ्या संघर्षाने झाले बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’

-कपूर घराण्याचे पाश तोडत केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तर ‘या’ कारणामुळे बेबोने राकेश रोशन यांना दिला होता डच्चू

-‘कन्यादाना’बद्दल बोलणे ‘बबली गर्ल’ला पडले भलतेच महागात, सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप

हे देखील वाचा