बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नृत्यदिग्दर्शिका आणि दिग्दर्शिका म्हणजे फराह खान. तीने 1992 साली आलेल्या ‘जो जीता वो ही सिकंदर’ या चित्रपटातून कारकिर्दीला सुरुवात केली. आजपर्यंत फराहने अनेक चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. फराह तिच्या नृत्यासोबतच तिच्या आणि करण जोहरच्या मैत्रीबद्दल देखील ओळखली जाते. हिंदी सिनेसृष्टीत फराह आणि करणची मैत्री खूप प्रसिद्ध आहे.
फराह आणि करण एकदा रितेश देशमुख आणि साजिद खान यांच्या ‘यारो की बारात’ या कार्यक्रमात आले असताना त्यांनी अनेक किस्से सर्वांसोबत शेयर केले. यावेळी करण जोहरने सांगितले की फराह त्याच्यासोबत लग्न करू इच्छित होती. याबाबतचा एक किस्सा स्वतः कारण जोहरने सर्वाना सांगितला होता.
फराह खान करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता हैं’ या सिनेमात एक छोटा रोल करत होती. या चित्रपटाची शूटिंग स्कॉटलंडमध्ये सुरु होती. एक दिवस रात्री फराह करणच्या रूममध्ये अचानक घुसली तेव्हा करण त्याच्या टी शर्ट शॉर्ट पॅंटमधे झोपला होता. फराहने करणला सांगितले की तिच्या रूममध्ये भूत आहे. त्यावर करण तिला म्हणाला मी काय तुला भुतांसोबत कविता म्हणणारा वाटतो का? मला मूर्ख समजलीस का?
तेव्हा फराहने करण समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी करणने तो प्रस्ताव तांत्रिक कारण असल्याचे सांगत नाकारला होता. फराह खानने देखील एका मुलाखतीदरम्यान ही गोष्ट मान्य केली आहे.
त्यानंतर फराहने 2004 साली दिग्दर्शक शिरीष कुंदर सोबत लग्न केले. महत्वाची गोष्ट म्हणजे फराह खान ही शिरीषपेक्षा तब्बल नऊ वर्षांनी मोठी आहे. आज या जोडीला दिवा, अन्या आणि सिजार नावाची तीन मुले आहेत. ( सिनेमाचं ए़़डिटींग भावासाठी होतं फक्त एक निमीत्त, थेट दिग्दर्शक फराह खानलाच पटवून केलं लग्न )
फराह खान ही नृत्यदिग्दर्शनासोबतच दिग्दर्शक देखील आहे. तिने 2004 साली आलेल्या ‘मैं हु ना’ या सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल टाकले. तिचा ‘ओम शांती ओम’ हा सिनेमा सर्वात जास्त हिट झाला होता. फराहने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय तिने 2012 साली आलेल्या ‘शिरीन फरहाद की तोह निकल पडी’ सिनेमात बोमन इराणी सोबत मुख्य भूमिका साकारली होती. फराहने टेलिव्हिजनवर देखील अनेक रियालिटी शो साठी जज म्हणून काम केले आहे.(when farah khan proposed karan johar for marriage but he rejected)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खऱ्या घटनांवर आधारित चित्रपट, जे बघतांना तुम्हालाही फुटेल घाम
दिल की गहराई में! निकिता दत्ताचा सिंपल लूक होतोय व्हायरल