Friday, March 29, 2024

सिनेमाचं ए़़डिटींग भावासाठी होतं फक्त एक निमीत्त, थेट दिग्दर्शक फराह खानलाच पटवून केलं लग्न

बॉलिवूडमध्ये बरेच पुरुष दिग्दर्शक आहेत, पण चित्रपटांच्या दिग्दर्शनात महिला मात्र फारच कमी दिसतात. ही प्रथा मोडणारी प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खानने आतापर्यंत बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहे. 9जानेवारी 1965 रोजी मुंबईत जन्मलेली फराह तिचा 55 वा वाढदिवस साजरा केला. चित्रपट दिग्दर्शिका फराह एक प्रसिद्ध कोरिओग्राफर देखील आहे. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फराह तिच्या शिरीष कुंदरशी झालेल्या लग्नाबद्दलही चर्चेत असते. तर मग आज आम्ही तुम्हाला फराहच्या वाढदिवशी तिच्या लग्नाशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.

एडिटर आणि दिग्दर्शक शिरीष कुंदर याच्याशी फराह खानचं लग्न झालं आहे. फराह शिरीषपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. अशा परिस्थितीत जेव्हा दोघांच्या लग्नाची बातमी समोर आली तेव्हा या लग्नाबद्दल बरीच चर्चा झाली. परंतु, फराह आणि शिरीष दोघांनाही या बाहेरच्या गोष्टींनी काहीही फरक पडत नव्हता. एका मुलाखतीत फराहने स्वत: शिरीषच्या प्रस्तावाविषयी सांगितले. शिरीषने आपल्या शब्दांद्वारे तिच्यावर कशी जादू केली हेदेखील फराहने सांगितलं होतं.

शिरीष आणि फराहच्या प्रेमकथेची सुरुवात ‘मैं हूं ना’ चित्रपटाच्या सेटपासून झाली. शिरीषचं फराहवर खूप प्रेम होतं. जेव्हा त्याला चित्रपटासाठी एडिटरची पोस्ट ऑफर केली गेली तेव्हा त्याने लगेच हो म्हटलं होतं. विशेष म्हणजे शिरीषला या चित्रपटासाठी अपेक्षेपेक्षा कमी पैसे मिळाले होते. तरीही शिरीषने फक्त फराहसाठीच या चित्रपटाला होकार दिला होता. यानंतर, त्यांनी 7 महिने एकमेकांना डेट केलं होतं.

फराहने सांगितले होते की, शिरीष तिच्यावर मनापासून प्रेम करत होता, परंतु तिला हे माहित नव्हतं. फराह त्याची क्रश होती. परंतु त्याला तिच्याबरोबर वेळ वाया घालवायचा नव्हता. फराहबरोबर लग्न करावं अशी त्याची इच्छा होती. हेच कारण होतं की फराहला प्रपोज करताना त्याने आपले मनातील सगळं तिला स्पष्टपणे सांगितलं होतं.

फराह पुढे म्हणाली की जेव्हा शिरीषने तिला प्रपोज केलं होतं तेव्हा त्याने खूपच प्रेमळ गोष्टी सांगितल्या होत्या. शिरीष म्हणाला होता, “डार्लिंग, तुला माझ्याशी लग्न करायचं नसेल, तर दूर जा. मला फक्त तुझ्याकडे पाहून माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. जर तू आपल्याबाबतीत गांभीर्याने विचार करत आहेस आणि आपण लग्न करणार असू तरच आपले हे संबंध पुढे कायम ठेवू.”

शिरीषच्या या प्रस्तावाला फराहने फार विचार केला आणि मग ती हो म्हणाली होती. यानंतर दोघांनीही 2004 मध्ये प्रथम रजिस्टर मॅरेज केलं. त्यानंतर दक्षिण भारतीय पद्धतीमध्ये लग्न आणि मग निकाह केला. आज दोघांनाही तिळं झालं असून जार, दिवा आणि अन्या अशी तिन्ही मुलांची नावं आहेत.(farah khan birthday special 9 years younger shirish kunder proposed to her in the most romantic way possible)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरे बापरे! फराह खान होती करण जोहरच्या प्रेमात, तांत्रिक अडचण सांगत ‘त्याने’ नाकारला प्रस्ताव

पतीच्या ‘या’ गोष्टीला कंटाळलेली फराह खान लग्नाच्या एका वर्षातच जाणार होती पळून, वाचा रंजक किस्सा

हे देखील वाचा