Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड धर्मेंद्र यांच्यासोबत फोटोत दिसणाऱ्या ‘या’ गोंडस चिमुकलीला ओळखलं का? आहे चित्रपटसृष्टीतील मोठ्ठं नाव

धर्मेंद्र यांच्यासोबत फोटोत दिसणाऱ्या ‘या’ गोंडस चिमुकलीला ओळखलं का? आहे चित्रपटसृष्टीतील मोठ्ठं नाव

आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे हल्ली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच आपले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आपले वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देत असतात. ते अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबर, चाहत्यांबरोबर तसेच त्यांच्या फार्महाऊसचे फोटो शेअर करतात. मात्र, यावेळी त्यांच्या मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. कोण आहे ती मुलगी? हे जाणून घेण्यासाठी तुम्हीही नक्कीच उत्सुक असाल. चला तर जाणून घेऊया…

तर ही मुलगी म्हणजे इतर कोणी नसून धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल आहे. ईशा हे देखील चित्रपटसृष्टीतील मोठ्ठं नाव आहे. ईशाने नुकताच इंस्टाग्राम अकाऊंटवर थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा फोटो शेअर करत ईशाने कॅप्शन देत लिहिले आहे की, “थ्रोबॅक गुरुवार, दोन छोटे पक्षी आणि एक ही-मॅन.” तिने शेअर केलेला हा फोटो चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या फोटोत ईशाने आपल्या वडिलांना म्हणजेच धर्मेंद्र यांना ही-मॅन असे म्हटले आहे. या फोटोमध्ये छोटी ईशा आणि तिचे वडील धर्मेंद्र यांच्या हातात एक पक्षी आहे. चाहते या फोटोला प्रचंड प्रेम व प्रतिसाद देत आहेत.

धर्मेंद्र प्रसिद्धीपासून दूर असलेल्या त्यांच्या फार्महाऊसवर जास्त वेळ घालवतात. संपूर्ण कोरोना काळात ते निसर्गाच्या सानिध्यात राहतायत. काही दिवसांपूर्वी ते ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर शत्रुघ्न सिन्हासोबत दिसले होते. जिथे दोघांनी एकमेकांचे रहस्य उघड केले.

ईशा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आहे. तिने ‘कोई मेरे दिल से पूछे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या उत्तम चित्रपटांमध्ये ‘युवा’, ‘काल’, ‘धूम’, ‘दस’, ‘नो एन्ट्री ‘ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. ती लवकरच अजय देवगणसोबत ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमध्येही दिसणार आहे. ‘एक दुआ’ चित्रपटाची ती निर्मातीही बनली आहे. ईशा देओलने २०१२ मध्ये भरत तख्तानीशी लग्न केले होते आणि तिला दोन मुले आहेत.

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये परतली आहे. यासोबतच तिने भारत ईशा फिल्म्सच्या प्रोडक्शन हाऊसचीही घोषणा केली आहे. जी तिने पती भरत तख्तानीसोबत लॉन्च केली होती. या प्रोडक्शन हाऊसने निर्मिती केलेला पहिला चित्रपट राम कमल मुखर्जी दिग्दर्शित ‘एक दुआ’ आहे. ईशा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काजोलसोबतच्या अफेअरच्या अफवांवर शाहरुखने दिले होते उत्तर; म्हणाला होता, ‘मी काजोलबरोबरही तिच्या घरी…’

-किर्तनकार शिवलीला पाटील बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर? पाहा काय आहे नक्की प्रकरण

-पर्सच्या निमित्ताने पुन्हा रंगला अनुपम खेर आणि त्यांच्या आईमध्ये मजेशीर संवाद

हे देखील वाचा