कलाकरांना नेहमी त्यांची स्वतःची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते. स्क्रीनवर उत्तम पद्धतीने उठून दिसण्यासाठी कलाकार स्वतःवर जीवापाड मेहनत घेतात. अभिनेत्रींना तर अधिक श्रम घ्यावे लागतात. कलाकार हे फक्त पडद्यावर दिसण्यासाठी नाही तर त्यांच्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावतानाही आपण कसे चांगले आणि आकर्षक दिसू याकडे लक्ष देत असतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहे, ज्यांच्या चर्चा लोकांमध्ये, मीडियामध्ये सोशल मीडियावर सतत रंगताना दिसतात. त्यापैकी एक असलेली अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. सर्वांची लाडकी मुन्नी चाळीशी नंतरही सर्वांना तिच्या बोल्डनेसने, तिच्या अदांनी, तिच्या कातिल नजरेने घायाळ करत असते. या ना त्या कारणांमुळे त्यातही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मलायका सतत प्रकाशझोतात येते. याशिवाय मलायकाचे फोटोशूट देखील तिला मीडियाच्या आणि फॅन्सच्या नजरेत आणताना दिसते.
मलायकाने स्वतःला इतके फिट आणि उत्तम मेंटेन केले आहे, ज्यामुळे तिच्यावर प्रत्येक ड्रेस, प्रत्येक स्टाईल चांगलीच दिसते. मलायका देखील तिला दिले जाणारे प्रत्येक आऊटफिट अतिशय आत्मविश्वासाने कॅरी करते. मलायका नेहमी नकारत्मकतेपासून स्वतःला दूर ठेवत तिचे स्वछंदी आयुष्य जगते. सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असणारी मलायका पुन्हा एकदा सोशल मीडिया गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
मलायकाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही क्लासी फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा लूक पाहून प्रत्येक जणं तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही. मलायकाने गोव्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या उपस्थितीने आणि लूकने सर्वांचेच मनं जिंकून घेतले आहे. याच ड्रेसवरील काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे.
मलायकाने या इव्हेंटमध्ये फॅशन स्टायलिस्ट तान्या घावरीने डिझाइन केलेला गाऊन घातला होता. तिने घातलेला हा गाऊन मर्चेसा प्रकारातील होता, जो तिच्यावर खूपच सुंदर दिसत होता. या गाऊनवर फेदर, रफल्स, फ्लोरल डिझाइन ड्रेसला अधिकच आकर्षक केले होते. तिने तिच्या या लूकवर अगदी मोजकीच ऍक्सेसरीज घातली होती आणि मेकअपही साधा होता. तिच्या या ड्रेसवर तिने लावलेली पर्पल रंगाची लिपस्टिक भाव खाऊन गेली. सध्या मलायका एमटीव्हीच्या सुपरमॉडेल ऑफ द इयर या रियॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. याच शोच्या या कार्यक्रमासाठी तिने गोव्यामध्ये हजेरी लावली होती.
लवकरच मलायका सोनी टीव्हीवर सुरू होणाऱ्या इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये गीता कपूर आणि टेरेंस लुईस यांच्यासोबत परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोला प्रमोट करताना मलायका कपिल शर्मा शोमध्ये दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बिग बॉसपेक्षा जास्त पैसे मी बाहेर राहून कमावू शकते, म्हणत ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीने धुडकावली ऑफर










