Wednesday, February 4, 2026
Home अन्य रणवीर सिंगने फॅमिली प्लॅनिंगबद्दल केला खुलासा; म्हणाला, ‘आम्हालाही दोन…’

रणवीर सिंगने फॅमिली प्लॅनिंगबद्दल केला खुलासा; म्हणाला, ‘आम्हालाही दोन…’

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते. यानंतर त्यांनी २०१८ मध्ये लग्न केले. दोघांनाही इंडस्ट्रीतील पॉवर कपल म्हटले जाते. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट लिहित असतात. त्यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. अलीकडेच रणवीर सिंग फॅमिली प्लॅनिंगबद्दल मोकळेपणाने बोलला आहे.

रणवीरने सांगितली ‘ही’ गोष्ट
नुरतेच रणवीरने टेलिव्हिजनवर पदार्पण केले आहे. तो ‘द बिग पिक्चर’ या गेम शोमध्ये दिसत आहे. कलर्स वाहिनीवर १६ ऑक्टोबरपासून रात्री ८ वाजता शो सुरू झाला. दरम्यान रणवीरने एका स्पर्धकाशी बोलताना फॅमिली प्लॅनिंगबद्दल खुलासा केला आहे. रणवीर म्हणाला की, “२-३ वर्षात आम्हालाही मुले होतील. अभय भैय्या तुझी वहिनी इतकी क्यूट बेबी होती ना, तिने मलाही अशीच कोणीतरी दिली की, आयुष्य सेट होईल यार. मी मुलांची नावे शॉर्टलिस्ट करत आहे. जर तुम्हाला हरकत नसेल तर मी हे सूर्यवीर सिंग घेऊ.”

दीपिका आणि रणवीर अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांच्या कामाची स्तुती करताना दिसतात. या क्विझ शो दरम्यानही रणवीरने पत्नी दीपिकाचे कौतुक केले आणि सांगितले की, तिने माझ्या टीव्ही पदार्पणासाठी मला प्रेरित केले आहे. त्याने सांगितले की, “शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी खूप नर्वस आणि उत्साहित होतो. दीपिकाने मला फुले आणि चिठ्ठी पाठवली. तिने मला शोसाठी शुभेच्छा दिल्या.”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर रणवीर सिंग लवकरच कबीर खानच्या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘८३’ मध्ये दिसणार आहे. यापूर्वी त्याचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. दिवाळीनिमित्त हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय, अजय देवगण देखील या चित्रपटाचा एक भाग आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणवीर सिंग अन् दीपिका पदुकोणचा ‘८३’ चित्रपट

-जेव्हा पार्टीत रणवीरसमोरच अर्जुनने केले दीपिकाला किस; पाहण्यासारखी होती अभिनेत्याची रिऍक्शन

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

हे देखील वाचा