बॉलिवूडमधील महानायक अशी ज्यांची ओळख आहे, ते म्हणजे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन होय. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी त्यांनी काही वर्ष कोलकातामध्ये घालवले आहेत. त्यावेळी या शहराचे नाव कलकत्ता असे होते. १९६३ ते १९६८ पर्यंत जवळपास ५ वर्ष ते कोलकातामध्ये राहत होते. त्यांनी एक फोटो शेअर करून जुन्या दिवसांना उजाळा दिला आहे. हा फोटो काही जुन्या काळातील नाही, तर या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री क्रिती सेनन दिसत आहे. ते क्रितीसोबत कपल डान्स करत पोझ देताना दिसत आहेत. त्यावेळी हा फोटो काढलेला आहे.
अमिताभ बच्चन यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिग बी आणि क्रिती ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर दिसत आहेत. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांनी काळ्या रंगाचा सूट घातला आहे आणि क्रितीने सुंदर लाल रंगाचा लाँग ड्रेस घातला आहे. तसेच केसांची पोनीटेल घातली आहे. फोटोमध्ये ते डान्स पोझ देताना दिसत आहेत.
हा फोटो शेअर करून अमिताभ बच्चन यांनी कॅप्शन दिले आहे की, “क्रिती सेननसोबत बॉलरूम डान्सिंग. आहा पुन्हा ते कॉलेज आणि कोलकत्याचे दिवस आठवले.” त्यांनी शेअर केलेल्या या फोटोला त्यांच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. त्यांच्या या फोटोला आतापर्यंत ५ लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अजूनही या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. (bollywood actor amitabh bachchan share a photo with kriti senon on social media)
मुंबईमध्ये जाऊन चित्रपटात काम करणारे अमिताभ बच्चन यांनी सुरुवातीला अनेक कंपनीमध्ये काम केले आहे. काम करता त्यांनी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. इथूनच त्यांच्या अभिनयातील कला सगळ्यांना दिसली. इथूनच खरी त्यांच्या अभिनयातील करिअरला सुरुवात झाली. जेव्हा ते सुरुवातीला कोलकातामध्ये ‘बर्ड अँड हिल्जर्स’ कंपनीत काम करत होते, त्यावेळी त्यांना केवळ ५०० रुपये पगार होता. त्यानंतर त्यांनी जेव्हा दुसऱ्या कंपनीत काम केले, तेव्हा त्यांचा शेवटचा पगार १६८० रुपये एवढा होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बीच बॉम्ब’ मीरा राजपूतने शेअर केला तिचा ग्लॅमरस, मादक बिकिनी फोटो
-कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे










