Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीत करणार धमाका; चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टिझर रिलीझ

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीत करणार धमाका; चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टिझर रिलीझ

सुपरस्टार अक्षय कुमार या दिवाळीला चाहत्यांना मोठे सरप्राईज देणार आहे. तो अखेर दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ‘सूर्यवंशी’ चित्रपटाद्वारे चित्रपटगृहांमध्ये पोहोचणार आहे. प्रेक्षक बऱ्याच काळापासून त्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. अलीकडेच त्याने दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित करत असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. आता या चित्रपटातील ‘आयला रे आयला’ या गाण्याचा टिझर बुधवारी (२० ऑक्टोबर) प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी गाण्याची काही झलक टिझरमध्ये दाखवण्यात आली आहे. अक्षयसोबत, ‘सिंघम’ अजय देवगण आणि ‘सिम्बा’ रणवीर सिंग हे सुद्धा ‘सूर्यवंशी’च्या पहिल्या गाण्यात दिसत आहेत.

अक्षय, अजय आणि रणवीर हे सर्व रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स चित्रपटाचा भाग आहेत. ‘आयला रे आयला’ या गाण्याचा टिझर पोस्ट करताना अक्षयने लिहिले की, “या दिवाळीत आम्ही सूर्यवंशी घेऊन परत आलो आहोत. आयला रे आयला या गाण्याचा टिझर येथे आहे.”

त्याचवेळी, रणवीरने लिहिले आहे की, “जेव्हा सिंघम, सिंबा आणि सूर्यवंशी एकत्र असतात, तेव्हा एक उत्सव होतोच.” रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट या दिवाळीत ५ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेक वेळा बदलण्यात आली आहे आणि त्यामागे अनेक कारणे होती. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आणि नंतर लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद होती.

आता सर्व काही सामान्य स्थितीकडे जात असताना, चित्रपटाच्या निर्मात्यांनी तो प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आयला रे आयला’ या गाण्याच्या टिझरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटासंबंधीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘सूर्यवंशी’ चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत, तर अजय देवगण आणि रणवीर सिंग पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्वा! घटस्फोटानंतर बिनधास्त लूकमध्ये दिसली अभिनेत्री समंथा; बेस्ट फ्रेंडसोबतचा मजेशीर व्हिडिओ केला शेअर

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

-अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

हे देखील वाचा